*मालवण तालुका काँग्रेसच्यावतीने इंधन दरवाढी विरोधात निदर्शने

मोदी सरकारविरुद्ध घोषणा देत नोंदवला तीव्र निषेध*

मालवण (प्रतिनिधी) लुटेरी मोदी सरकार पेट्रोल हुआ सौ पार, मोदी सरकार हाय हाय… अशा घोषणा देत मालवण तालुका काँग्रेसच्या वतीने आज मालवण पेट्रोल पंप समोर इंधन दरवाढी विरोधात निदर्शने करून मोदी सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. या आंदोलनात काँग्रेसचे प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण, मालवण तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी, युवक काँगेसचे जिल्हा प्रवक्ते अरविंद मोंडकर, संदेश कोयंडे, हेमंत माळकर, महेंद्र मांजरेकर, राम धनावडे, हेमंत कांदळकर, जेम्स फर्नांडिस, लक्ष्मीकांत परुळेकर, बाबा मेंडीस, श्रेयस माणगावकर, शेखर डीचोलकर आदी सहभागी झाले होते. केंद्रातील मोदी सरकारने केलेल्या पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरवाढीच्या विरोधात काँग्रेसतर्फे हे आंदोलन छेडण्यात आले. पेट्रोल डिझेल शंभर पार… मोदी बस करा जनतेची लूटमार, चले जाव, चले जाव… मोदी सरकार चले जाव… अशा घोषणा यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी देत मोदी सरकारविरोधात निषेध व्यक्त केला. यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

You cannot copy content of this page