Headlines

ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षेत सिंधुदुर्ग केंद्राचा ५३ टक्के निकाल

गौरी केळुसकर प्रथम, वृषाली कोळसुलकर द्वितीय, तर दीपिका गाणार तृतीय

कुडाळ : महाराष्ट्र शासनमान्य ग्रंथपालन प्रमाणपत्र वर्ग २०२६ च्या जून महिन्यात घेण्यात आलेल्या परीक्षेत कुडाळ येथील सिंधुदुर्ग केंद्राचा ५३ टक्के निकाल लागला आहे. रा. ब. अनंत शिवाजी देसाई वाचनालय (जिल्हा ग्रंथालय), कुडाळ येथे आयोजित या केंद्रातून एकूण ३४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, सहा विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, ११ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी, तर एका विद्यार्थ्याने तृतीय श्रेणी मिळवली.
या परीक्षेत गौरी चंद्रकांत केळुसकर हिने प्रथम, वृषाली सुभाष कोळसुलकर हिने द्वितीय, तर दीपिका आनंतराव गाणार हिने तृतीय क्रमांक पटकावला.
सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाच्या सहकार्याने आणि कोकण विभाग ग्रंथालय संघाच्या शिफारशीनुसार या वर्गाला महाराष्ट्र शासनाची मंजुरी मिळाली आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मसके, वाचनालयाचे अध्यक्ष अरविंद शिरसाट, कार्यकारी मंडळाचे पदाधिकारी व सदस्य, वर्ग व्यवस्थापक राजन पांचाळ, मुख्याध्यापक प्रसाद जाधव, विषय शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांनी वाचनालयाच्या वेळेत आपली गुणपत्रके घेऊन जावीत, असे आवाहन वर्ग व्यवस्थापक राजन पांचाळ यांनी केले आहे. तसेच गुणपत्रकांची फेरतपासणी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी गुणपत्रिकेच्या प्रतीसह १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत वर्ग व्यवस्थापकांच्या नावे अर्ज करावा, असेही कळविण्यात आले आहे.

You cannot copy content of this page