सिंधुदुर्गनगरी ता ४
सिंधुदुर्ग जिल्ह्यात श्रीकृष्ण जन्माष्टमी कार्यक्रम आज शुक्रवारी मोठ्या आनंदात पार पडला असून शनिवारी जिल्ह्यात १३४ ठिकाणी दहीहंडीचा थरार पाहायला मिळणार आहे. यामध्ये खाजगी ११, सार्वजनिक ११७ तर राजकीय ६ दहीहंडीचा समावेश आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. अनेक ठिकाणी कृष्णमूर्तीची पूजा केली जाते. जिल्ह्यात आज कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव पार पडला असून शनिवारी जिल्ह्यात ठीक ठिकाणी विविध सार्वजनिक मंडळे तसेच राजकीय व खाजगी दहीहंडी बांधली जाते. यावर्षी जिल्ह्यात खाजगी ११, सार्वजनिक ११७ तर राजकीय ६ अशा एकूण १३४ दहीहंडी बांधल्या जाणार आहेत .विविध गोविंद पथके दहीहंडी फोडण्यासाठी मोठ्या उत्साहात यामध्ये सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे. जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या राजकीय दहीहंडी मध्ये वैभववाडी १, सावंतवाडी १, कुडाळ २, कणकवली १ , विजयदुर्ग १, दहीहंडीचा समावेश आहे. तसेच सार्वजनिक दहीहंडी मध्ये आचरा ४, वैभववाडी २, देवगड ७, सावंतवाडी २०, वेंगुर्ला १०, बांदा ४, निवती ४, कुडाळ ८, मालवण २१, कणकवली २१, विजयदुर्ग ७ तर सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ९ दहीहंडीचा समावेश आहे.
