Headlines

करूळ बौद्धवाडीत नवीन डीपी कार्यान्वित…

ग्रामपंचायतीच्या पाठपुराव्याला यश: पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून मंजुरी..

⚡वैभववाडी ता.२२-: करूळ बौद्धवाडी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या वीज वितरण कंपनीच्या डीपीचे (रोहित्र ) उद्घाटन जिल्हा बँकेचे माजी संचालक दिगंबर पाटील व पंचायत समितीच्या उपसभापती साची कोलते यांच्या हस्ते करण्यात आले.
करूळ बौद्धवाडी येथील जुनी डीपी जीर्ण झाल्याने धोकादायक बनली होती. त्यामुळे या ठिकाणी नवीन डीपी बसविण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत होती. ग्रामपंचायत करूळच्या वतीने यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून नवीन डीपी मंजूर करण्यात आली. पालकमंत्री राणे यांनी वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत आवश्यक सूचना दिल्यानंतर संबंधित यंत्रणेने नवीन डीपी बसविण्याचे काम पूर्ण केले.
नवीन डीपीमुळे गावातील बहुतांश वाडीतील व परिसरातील वीजपुरवठा अधिक सुरक्षित व सुरळीत होण्यास मदत होणार आहे. ग्रामपंचायतीच्या पाठपुराव्याला यश मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
उद्घाटनप्रसंगी सरपंच नरेंद्र कोलते, माजी सरपंच हिंदुराव पाटील, रवींद्र पवार, प्रकाश सावंत, महेश कदम, सचिन कोलते, रोहिणी लाड, शरद सावंत, राजेंद्र गुरव, सिद्धेश कोलते, सुधीर पवार, विजय पवार, दिलीप पवार तसेच वीज वितरण कंपनीचे अधिकारी श्री. तळेकर, वायरमन श्री. गायकवाड, श्री. पाटणकर, अवि गुरव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page