राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी घेतली आरोग्यमंत्रांची भेट;प्रत्यक्ष येऊन पाहणी करण्याची केली मागणी
*💫कुडाळ दि.०१-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाढती कोरोना रूग्ण संख्या तसेच अपुरी आरोग्य यंत्रणा याबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी तातडीने मुंबई येथे जाऊन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेबाबत सविस्तर चर्चा करून लेखी निवेदन सादर केले आहे. तसेच प्रत्यक्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यात येऊन आरोग्य यंत्रणेची पाहणी करावी अशी विनंती केली आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढती रूग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी लवकर तज्ञ डाँक्टरांचे पथक सिंधुदुर्गात पाठवावे अशी मागणी केली आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यावेळी ही विनंती तात्काळ मान्य करून लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची पाहणी करण्यासाठी येणार असल्याचे सांगून जिल्ह्यातील वाढत्या कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी त्वरित तज्ञ डाँक्टरांचे पथक सिंधुदुर्गात पाठविण्यात येईल असे आश्वासन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांना दिले आहे.
