Headlines

अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीप्रकरणी दोषींना कठोर शिक्षा द्या…

काँग्रेसची मागणी: सावंतवाडीत प्रार्थना पसायदान व भजन कार्यक्रम करून घटनेचा केला निषेध..

सावंतवाडी, ता. १३-: अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील दानपेटी चोरीप्रकरणी दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करून त्यांना कडक शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी केली. या घटनेच्या निषेधार्थ सावंतवाडी येथील श्री साई मंदिरात प्रार्थना, पसायदान व भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सावंतवाडी पोलिस ठाण्यात निवेदन सादर केले.

यावेळी बोलताना मोंडकर म्हणाले, “अयोध्येतील श्रीराम मंदिरात देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात आणि श्रद्धेने दानपेटीत देणगी अर्पण करतात. अशा पवित्र स्थळी चोरीसारखी घटना घडणे अत्यंत निंदनीय असून यामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत. या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी, तसेच त्यांना सद्बुद्धी लाभावी, अशी आमची मागणी आहे.

या आंदोलनात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभय मालवणकर, ज्येष्ठ नेते दिलीप नार्वेकर, माजी नगरसेवक राजू मसुरकर, माजी जिल्हाध्यक्ष समीर वंजारी, कौस्तुभ पेडणेकर, अरुण भिसे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page