Headlines

राऊत पिता-पुत्राच्या अशोभानीय कृत्याचा जाहीर निषेध – संध्या तेरसे

कुडाळ : माजी खासदार विनायक राऊत आणि त्याचा पुत्र गीतेश राऊत यांच्या अशोभनीय कृत्याचा जाहीर निषेध करावा तेवढा थोडाच आहे, असे कुडाळच्या भाजप नगरसेविका संध्या तेरसे यांनी म्हटले आहे. एका लोकप्रतिनिधी कडून असे घडणे म्हणजे ही खूपच लांनच्छानस्पद बाब आहे. त्याच्यावर त्वरित कडक कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी सौ. तेरसे यांनी केली आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात संध्या तेरसे यांनी म्हटले आहे, मागे कोणीतरी एका सिरीयल मध्ये कोकण म्हणजे मांत्रिकी – देवसकी- भुताटकी – बुवाबाजी असं दाखवलं होत. त्यावर आम्ही आवाज उठवत आमच्या कोकणची बदनामी सहन केली नव्हती. यात पक्षीय राजकारण अजिबात नाही. सिंधुदुर्गची एक वेगळी अभिमानास्पद ओळख आहे, लग्नात हुंडा घेत नाही आणि देतही नाही, लग्नाचा खर्च दोन्ही कडचे समान करतात, आमच्याकडे हुंडाबळी अजिबात नाही ही आमची ओळख पण या माजी खासदारांनी आमच्या जिल्ह्याची इज्जत घालवली.
आमच्याकडे सुनेला मुलगी मानत नाही तर मुलीसारखं वागवतात. प्रत्येक कुटुंबात वाद – विवाद असतातच पण एका महिलेचा अशाप्रकारे छळ करणे हे आमच्या कोकणी संस्कृतीत बसत नाही.
श्रीमती गिरीजा राऊत यांना लवकरात लवकर न्याय मिळावा व संबंधित राऊत पिता-पुत्र आणि जे कोणी या गुन्ह्यात सामील आहेत त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन या सिंधुदुर्गच्या भूमीने तुम्हाला दोन वेळा खासदार केलं त्याच सिंधुदुर्गचा तुम्ही अपमान केला. आता कुठल्या तोंडाने महाराजांचे नाव घ्याल?
माझं जिल्हातील उबाठाच्या महिला पदाधिकारी किंवा इतर सर्व पक्षीय महिलांना आवाहन आहे, आपल्याच जिल्हातील माजी खासदारांवर जर अशा प्रकारचा गुन्हा त्यांची स्वतःची सून दाखल करत असेल तर एक सामाजिक जाणीव असलेली महिला म्हणून आपण सर्वसानीच या गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हावी अशी एकमताने मागणी करूया, असे सौ. तेरसे यांनी शेवटी म्हटले आहे.

You cannot copy content of this page