Headlines

वेंगुर्ला तालुका शिवसेना तालुकाप्रमुख व शहरप्रमुख निवड दोन दिवसात

श्री.सचिन वालावलकर; शिवसेनेमार्फत 18 जुलै रोजी भव्य मोफत आरोग्य शिबीर

वेंगुर्ला
वेंगुर्ला तालुका शिवसेना, सचिन वालावलकर मित्रमंडळ, वालावलकर हॉस्पिटल डेरवण व वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि.18 जुलै रोजी वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालय येथे सकाळी 10 वा. ते दुपारी 2 या वेळेत भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
तालुक्यातील व शहरातील अधिकाधिक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी रविवारी वेंगुर्ला येथे आयोजित सभेत केले. वेंगुर्ला तालुका शिवसेना पक्षाची मासिक सभा येथील मध्यवर्ती कार्यालय नजीक जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी संपन्न झाली. यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष सुनील डूबळे, जिल्हा संघटक बाळा दळवी, जिल्हा युवासेना पदाधिकारी हर्षद डेरे, म्हापण जि. प. सदस्य यज्ञा साळगावकर, नगरसेविका समिधा रेडकर व लीना म्हापणकर, उभादांडा पं. स. सदस्य साक्षी नार्वेकर, तसेच शहर पदाधिकारी स्वप्निल गावडे, अजित राऊळ, सत्यवान साटेलकर, आबा कोचरेकर, अण्णा वजराटकर, आडेली वेतोरे संघटक मींतेश परब, मातोंड ग्रा. पं. सदस्य दिपेश परब, दत्तात्रय साळगावकर, शैलेश नार्वेकर, कार्मिस आल्मेडा, संतोष गावडे,
तसेच अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सचिन वालावलकर यांनी सर्व पदाधिकारी यांनी याबाबत ग्रामीण स्तरावर माहिती पोहोचवावी. तसेच दोन दिवसात वेंगुर्ला तालुका शिवसेना तालुकाप्रमुख व शिवसेना शहरप्रमुख यांची निवड करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
तसेच सुनील डूबळे यांनी बोलताना, वेंगुर्ला नगरपरिषद बाजारपेठ कार्यक्षेत्रात ट्राफिक समस्या निर्माण होत आहेत. येथील समस्याविषयी नगरसेविका समिधा रेडकर व लीना म्हापणकर यांनी शिवसेनेच्या माध्यमातून नगरपरिषदेत नागरिकांचे प्रश्न मांडावेत, असे सुचित केले. तसेच डुबळे यांनी आ. निलेश राणे व आ. दिपक केसरकर दोन्हींचा अभिनंदन ठराव मांडला. बाळा दळवी यांनीही सर्व पदाधिकारी यांनी ग्राम स्तरावर नागरिकांपर्यंत पोहोचवून याचा लाभ द्यावा, असे बोलताना सांगितले. स्वप्निल गावडे यांनी आभार मानले.

You cannot copy content of this page