ह्युमन राईट्स प्रोटेक्शन ट्रस्ट प्रदेश सहसचिव अमित वेंगुर्लेकर यांची मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी*
*💫सावंतवाडी दि.३१-:* बाजारपेठेत सकाळी सात ते अकरा या वेळेत आरोग्य यंत्रणेच्या नियमांची पायमल्ली होत असताना, पालिका कर्मचारी चार चाकी वाहने रस्त्यावर थांबवून एकट्याला देखील मास्क लावण्याची सक्ती करत आहेत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढत असताना देखील जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता उपाययोजना करण्यात येत नाही आहेत. असा आरोप ह्युमन राईट्स प्रोटेक्शन ट्रस्ट प्रदेश सहसचिव अमित वेंगुर्लेकर यांनी केला आहे. पालिका प्रशासनाकडून गेल्या वर्षी प्रमाणे गर्दी टाळण्यासाठी प्रत्येक भागात पुन्हा एकदा आवश्यक दुकानाची व्यवस्था करण्यात यावी. या संदर्भात मुख्याधिकारी यांनी तातडीने तसे आदेश द्यावेत आणि बाजारपेठेतील गर्दी टाळावी अशी मागणी अमित वेंगुर्लेकर यांनी केली आहे. तसेच या वेळेत होणारी वाहतूककोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी वाहतूक नियंत्रण पथकाची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी ह्युमन राईट्स प्रोटेक्शन ट्रस्ट प्रदेश सहसचिव अमित वेंगुर्लेकर यांनी केली आहे.
