मळेवाड-कोंडूरे विलगिकरण कक्षास आर्थिक मदत

राऊत कुटुंबाने दिले २० हजार रुपये

*💫सावंतवाडी दि.३१-:* ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे च्या गावी विलगीकरण कक्षासाठी राऊत कुटुंबियांकडून 20 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. गावागावात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने सरकारने होम आयसोलेशन बंद करून सर्व ग्रामपंचायतना गाव पातळीवर गाव विलगीकरण कक्ष सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे सरपंच हेमंत मराठे यांनी राणी पार्वती देवी विद्यालय मळेवाड शाळा नंबर 1 मध्ये गाव विलगीकरण कक्ष सुरू केला आहे.या कक्षामध्ये कोरोना बाधित रुग्णांना विलगीकरण ठेवण्यात येणार असून त्यांच्या चहा-नाश्ता साठी विलास उर्फ बबन राऊत, रमाकांत राऊत, मोहन राऊत व राऊत कुटुंबीय यांच्याकडून रोख रुपये 20 हजार ची मदत सरपंच हेमंत मराठे व ग्रामसेवक अनंत गावकर यांच्याकडे सुपुर्त करण्यात आली आहे तसेच या विलगीकरण कक्षातील रुग्णांसाठी वाचनासाठी देण्यात येणाऱ्या दैनिकांचा खर्च महेंद्र राऊत यांनी पुरस्कृत केला आहे. या दात्यांचे ग्रामपंचायत कडून आभार मानण्यात आले.

You cannot copy content of this page