तौक्ते वादळानंतर किल्ले सिंधूदुर्गवरील विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात
मालवण दि प्रतिनिधी छत्रपतीची सागरी राजधानी असलेल्या मालवणच्या सिंधुदुर्ग किल्ल्याला तौक्ते चक्रीवादळाने तडाखा दिल्यानंतर किल्ल्यातील जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली असून आज किल्ल्यावरील शिवराजेश्वर मंदिरावर कोसळलेला वटवृक्ष हटविण्यास यश आहे आज मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी किल्यावर दोन कामगार पाठवून त्यांच्याकरवी हा वृक्ष हटविला छत्रपती शिवाजी महाराजांनी पमालवणच्या समुद्रात उभारलेल्या ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गला तौक्ते वादळाचा फटका बसला. यात महापुरुष आणि भवानी मंदिराचे छप्पर उडून नुकसान झाले होते तसेच किल्ल्यातील रहिवाशांच्या घरांच्या छप्परांचे नुकसान झाले. तर विद्युत तारा तुटून वीज पुरवठा देखील खंडित झाला होता. वादळाच्या तडाख्यात किल्ल्यातील शिवराजेश्वर मंदिराच्या बाजूला असलेला मोठा वृक्ष देखील कोसळला. यामुळे मंदिराच्या मागच्या बाजूच्या छप्पराच्या कडेचे अंशतः नुकसान झाले. तर त्याठिकाणी असलेल्या शेडचेही नुकसान झाले होते प्रारंभी मातृत्व आधार फाउंडेशन या सामाजिक संस्थेचे संस्थापक संतोष लुडबे, संतोष नागवेकर, दादा वेंगुर्लेकर यांच्या सहकार्यातून या झाडाच्या मंदिरावर कोसळलेल्या फांद्या हटविण्यात आल्या होत्या. तर आमदार वैभव नाईक यांनी उपलब्ध करून दिलेल्या दोन कामगारांच्या माध्यमातून हे झाड तोडून ते हटविण्यात आले आहे. याबाबत मंदिराचे पुजारी श्रीराम सकपाळ, किल्ला रहिवाशी संघाचे मंगेश सावंत व रहिवाशांनी आमदार वैभव नाईक व मातृत्व आधार फाउंडेशनचे आभार मानले आहेत.
