सिटीस्कॅन सेंटरचे कमी दराबाबत मनसेला पत्र;मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांना दिली माहिती_
*💫कुडाळ दि.३१-:* मनसेच्यावतीने एचआरसीटी दरा सबंधी घेतलेल्या आंदोलनाच्या भूमिकेला यश आले असून सिटीस्कॅन सेंटरने कमी दराबाबत मनसेला पत्र दिले आहे, अशी माहिती मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी मीडियाशी बोलताना दिली मनसे शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि शल्यचिकित्सक यांची भेट घेवुन खाजगी सिटीस्कॅन सेंटरमध्ये एचआरसीटी टेस्ट करिता अवाजवी दर आकारले जात असल्याबाबत निवेदन दिले होते. निवेदनात चार दिवसात कारवाई व्हावी व शासनमान्य दर लागु व्हावे, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. एचआरसीटी टेस्ट करीता ५५०० ते ७००० पर्यंत दर खाजगी लॅब आकारात होते. या भेटीच्या दुसऱ्या दिवशी मिडीयातील बातमीची दखल घेवुन पालकमंत्री यांनी ३००० ज्या वर जे सेंटर दर आकारेल त्यावर कारवाईचे आदेश दिले होते. मनसे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कमी दराबाबत जनजागृती करण्यात आली होती. याची दखल घेत सिटीस्कॅन सेंटरने कमी दराबाबत पत्र मनसेला दिले आहे. या पत्रात म्हटले की, २५०० ते ३००० रुपये दर सध्या केले असून दरपत्रक बाहेर लावले आहेत. मनसेच्या चार दिवसांच्या अल्टीमेटमच्या आधीच सामान्य जनतेला या तुन दिलासा मिळाला आहे. मनसेने घेतलेल्या आंदोलनाच्या भुमिकेचा सार्थक झाल्याचे धीरज परब यांनी मिडीयाशी बोलताना सांगितले. शासनाचा आदेश असताना हा सावळा गोंधळ घालुन जनतेला खर्चात घालणाऱ्या पालकमंत्री व आमदारांचे हे अपयश आहे. ओरोस अॅब्युलन्स प्रकरण असुदे किंवा आणि काहीहीमनसे पदाधिकारी सतर्कतेने जनतेचा आवाज बनत असल्याचे परब यांनी सांगितले.
