भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रास दिले आरोग्य साहित्य भेट*
*दोडामार्ग/ सुमित दळवी* दोडामार्ग तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे यामुळे या रुग्णांवर उपचार करताना आरोग्य विभागाला आवश्यक साहित्या अभावी मर्यादा येत आहे. यासाठी विविध स्तरातून अनेक लोक सामाजिक बांधिलकी जपून आरोग्य विभागाला आवश्यक साहित्य भेट देत आहेत. भेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील अशीच गरज ओळखून सेना उपजिल्हा संघटक गोपाळ गवस मित्रमंडळाने आरोग्य साहित्य भेट दिले. हे साहित्य प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सारंग यांच्याकडे सुपूर्द केले. यामध्ये ऑक्सि प्लोमिटर, 2,100 हॅन्ड ग्लोज, सॅनिटायझर,N95 मास्क, फेस शिल्ड, व्हेपोरायझर, आदी आरोग्य साहित्य सुपूर्द देण्यात आले. यावेळी गोपाळ गवस यांसह हेमंत कर्पे, अविनाश चिरमुरे, यशवंत गवस, तुषार देसाई, संदेश गवस, अजय कर्पे आदी यावेळी उपस्थित होते.
