Headlines

पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर यांच्याकडून सोनुर्ली शाळेत विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप…

⚡​सावंतवाडी ता.१७-:
सावंतवाडी पंचायत समितीचे सदस्य जितेंद्र गावकर यांनी सामाजिक भान राखत सोनुर्ली येथील जिल्हा परिषद शाळा नंबर एकच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक उपक्रमांतर्गत वह्यांचे वाटप केले. श्री. गावकर यांनी मुलांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी लावलेल्या या मोलाच्या हातभराबद्दल शाळा व्यवस्थापन समिती तसेच विद्यार्थी व पालक वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.
​पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर हे नेहमीच विविध सामाजिक कार्यातून पुढे आलेले नेतृत्व आहे. दातृत्व, नेतृत्व व कर्तृत्व हे तिन्ही गुण या युवा नेत्याच्या अंगी असल्याने ते वेळोवेळी सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून आपले दातृत्व दाखवून देत असतात. त्यांच्या याच जनसंपर्क आणि गुणांमुळे ते पंचायत समिती मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत.
​त्यांनी आपल्या सोनुर्ली, माजगाव व वेत्ये या मतदारसंघातील गावांमध्ये शैक्षणिक उपक्रम म्हणून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा उपक्रम हाती घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून सोनुर्ली जिल्हा परिषद शाळा नंबर एक येथे त्यांनी विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले. यावेळी त्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते बाबुराव तेंडुलकर, नागेश गावकर आधी उपस्थित होते. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक वर्ग, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांकडून त्यांचे विशेष आभार मानून समाधान व्यक्त केले जात आहे.

You cannot copy content of this page