⚡मालवण ता.१२-:
माझा सिंधुदुर्ग विकास संस्था (रजि.) व संलग्न माझा सिंधुदुर्ग ग्रुप यांच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आई / वडिलांचे छत्र गमावलेल्या व प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आधार देण्याच्या उद्देशाने शिष्यवृत्ती उपक्रमांतर्गत संपूर्ण वर्षासाठी लागणारे शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रम नुकताच मराठा समाज सभागृह, कुडाळ येथे संपन्न झाला. या उपक्रमाचे हे ६ वे वर्ष होते.
यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कुडाळ पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक जयदीप पाटील जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, फिल्मलाईन प्रोड्यूसर, दिग्दर्शक साई जळवी, ज्येष्ठ शिक्षक अविनाश वालावलकर माझा सिंधुदुर्गचे संस्थापक अध्यक्ष विकास पालव, माझा सिंधुदुर्गचे ज्येष्ठ सभासद-सल्लागार व उद्योजक प्रशांत गावडे, न्यू इंग्लिश स्कूल आरोस चे मुख्याध्यापक सदाशिव धुपकर निवृत्त शिक्षक किसन दुखंडे, उद्योजक सुनील पालव, शिष्यवृत्ती उपक्रम प्रमुख सौ. तेजल नागवेकर, महिला जागृतीच्या सामाजिक कार्यकर्त्या सौ. नंदिनी सामंत, दशावतार कलाकार नारायण आसयेकर यांच्यासह विविध शाळांचे शिक्षक, मुख्याध्यापक उपस्थित होते. त्याचप्रमाणे मुंबई, पुणे, सिंधुदुर्ग येथील माझा सिंधुदुर्गचे सभासद उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष विकास पालव यांनी प्रास्ताविक करताना उपक्रमाची माहिती देऊन पुढील वर्षी १२ वी नंतरच्या कोर्सेससाठी मदत तसेच संस्थेच्या उपक्रम समिती सदस्यांसाठी आपत्कालीन फंड उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगात व्यक्त करत संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थी, पालक यांना मार्गदर्शन केले. दादा साईल यांनी जिल्हा परिषदे मार्फत या उपक्रमाची नोंद घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी सिंधदुर्ग जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांतून निवडलेल्या १६० विद्यार्थ्यांना उपस्थितांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बादल चौधरी यांनी केले. नियोजन समितीच्या सौ. तेजल नागवेकर यांनी सर्वांचे आभार मानले.
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी माझा सिंधुदुर्ग – शिष्यवृत्ती नियोजन समितीचे सुधीर गावडे, पांडुरंग पालव, स्वप्नील तेली, संदीप साईल, प्रशांत दुखंडे, तेजल नागवेकर, उदय परब, अभिजित केरवडेकर, कृष्णा कदम यांनी विशेष मेहनत घेतली तसेच स्वप्नील पालव, सुरेश वारंग, दिपक तोरसकर, मंदार पारकर, सचिन शिंदे, ओमकार कुबल, सुगंधा साईल, सिया साईल, आबा भोजने, चंद्रशेखर सावंत यांचेही सहकार्य लाभले. यावेळी रुपेश भितये, संदेश कावले, अनिल पाटील, गणेश पाडगावकर, सागर राणे, हेमंत मोंडकर, संकेत पाटील, तनुजा तुळसुळकर, रेणुका राऊळ, वसंत परब, गोविंद पालव, जगदीश तांबे आदी व इतर उपस्थित होते.
