⚡सावंतवाडी ता.१२-: फक्त शासकीय दाखले देणे हाच उद्देश न ठेवता, गावातील प्रत्येक घरात पर्यावरण संवर्धनाचा संदेश पोहोचावा या मुख्य हेतूने धाकोरे ग्रामपंचायतीने निसर्गाच्या दृष्टीने एक चांगला निर्णय घेत सामाजिक दृष्टीने पाऊल उचलले आहे.
गावात ‘एक दाखला, एक वृक्ष’ या अभिनव नियमाची अंमलबजावणी अत्यंत उत्साहात सुरू करण्यात आली. आता ग्रामस्थांना कोणताही शासकीय दाखला हवा असल्यास आधी एक झाड लावावे लागणार आहे.
या उपक्रमामुळे प्रत्येक दाखल्यासोबत गावामध्ये एक नवे झाड लावले जाईल.त्याचप्रमाणे
दाखल्यांची प्रक्रिया डिजिटल करून गावाचा कारभार गतिमान केला आहे.
धाकोरे ग्रामपंचायत वतीने राबविण्यात येत असलेल्या शासकीय कामांना थेट निसर्ग संवर्धनाशी जोडणारा हा पहिलाच स्तुत्य उपक्रम आहे.
‘एक दाखला, एक वृक्ष’ या अभिनव नियमाची अंमलबजावणी अत्यंत उत्साहात सुरू झाली असून,
आता ग्रामस्थांना कोणताही शासकीय दाखला हवा असल्यास आधी पर्यावरणाची सेवा करावी लागणार आहे.
धाकोरे ग्रामपंचायतीकडून नवीन विवाह नोंदणी, कामगार दाखला, वारस दाखला किंवा नाहरकत प्रमाणपत्र (NOC) हवे असल्यास अर्जदाराला खालील दोन गोष्टींपैकी एक अट पूर्ण करावी लागणार आहे.
एक झाड लावून त्याचा ‘वृक्ष सेल्फी’ ग्रामपंचायतीला दाखवणे.गावात जलसंधारण वाढवण्यासाठी ‘शोषखड्डा खणल्याचा किंवा जुना शोषखड्डा दुरुस्त केल्याचा सेल्फी’ सादर करणे गरजेचे आहे.
हा स्तुत्य उपक्रम गावात सुरू झाला असून या उपक्रमाचे ‘पहिले मानकरी’ ठरले आहेत , ऋषिकेश आणि दीपक.
या अभिनव नियमाची सुरुवात अत्यंत सकारात्मकतेने झाली आहे.गावातील दोन सुजाण नागरिकांनी या मोहिमेत पहिले योगदान दिले असून यात
ऋषिकेश संतोष दळवी यांनी आपल्या लग्नाचा दाखला (विवाह नोंद) मिळण्यापूर्वी नियमाचे काटेकोर पालन केले. त्यांनी सुंदर वृक्षारोपण करून आपली ‘पर्यावरण सेल्फी’ सादर केली आणि आपला दाखला प्राप्त केला.
तसेच दीपक अनंत गोवेकर यांनीही एक जबाबदार नागरिक म्हणून कर्तव्य चोख बजावले. त्यांनी झाड लावल्याची सेल्फी दाखवून आपला ‘कामगार दाखला’ मिळवला.
“केवळ दाखले देणे ग्रामपंचायतचा उद्देश नसून, या उपक्रमांद्वारे गावातील प्रत्येक घरातून पर्यावरणाचा सुसंवाद घडावा, हा यामागील शुद्ध हेतू आहे. यावेळी ऋषिकेश आणि दीपक यांचे खास अभिनंदन करण्यात आले.
धाकोरे ग्रामपंचायतीच्या या डिजिटल आणि पर्यावरणपूरक उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. हा उपक्रम गावाचा विकास हिरवाईने नटवण्यासाठी आणि पाण्याचे दुर्भिक्ष कमी करण्यासाठी मैलाचा दगड ठरेल यात शंका नाही.
धाकोरे ग्रामपंचायतीच्या या आगळ्यावेगळ्या डिजिटल आणि पर्यावरणपूरक उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, इतर गावांसमोर त्यांनी एक नवा आदर्श ठेवला आहे.
या
