खारेपाटण हद्दीत अनोळखी युवकाचा मृतदेह आढळला…

⚡खारेपाटण ता.११-: खारेपाटण रेल्वे स्थानक हद्दीत रेल्वे ट्रॅकशेजारी एका अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आल्याची घटना समोर आली आहे. संबंधित युवकाचे वय अंदाजे ३० वर्षे असून त्याच्या चेहऱ्यावर, हातावर तसेच डाव्या बाजूच्या कमरेवर गंभीर दुखापती असल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत युवकाची अद्याप ओळख पटलेली नसून त्याबाबत माहिती मिळविण्यासाठी राजापूर पोलिसांनी नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे. परिसरातील नागरिकांनी तसेच विविध सामाजिक माध्यमांच्या माध्यमातून सदर युवकाची ओळख पटविण्यास मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सदर युवकाबाबत कोणतीही माहिती असल्यास अथवा आपल्या परिसरातील एखादी व्यक्ती बेपत्ता असल्याची माहिती असल्यास नागरिकांनी तात्काळ राजापूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक अमित यादव व पोलीस उपनिरीक्षक मोबिन शेख यांनी केले आहे.याकरीता अमित यादव (पोलीस निरीक्षक) – ९२७३९२६४२०, मोबिन शेख (पोलीस उपनिरीक्षक) – ७९७२३४३६९० या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page