विशाल परब व ॲड. अनिल निरवडेकर यांची प्रमुख उपस्थिती; सभामंडपासाठी सहकार्याचे आश्वासन.
⚡सावंतवाडी, ता. ०६-: सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे (देऊळवाडी) येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त सिंहासनाधिष्ठित शिवरायांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करून अभिवादन करण्यात आले. हा कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमास भाजपा युवा नेते विशाल प्रभाकर परब, सावंतवाडी उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर तसेच भाजपा युवामोर्चा अध्यक्ष हितेन नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ॲड. अनिल निरवडेकर आणि विशाल परब यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा इतिहास, स्वराज्य निर्मितीतील त्यांचे योगदान आणि आजच्या पिढीने शिवविचार आत्मसात करण्याची गरज यावर भाष्य केले.
यावेळी विशाल परब यांनी उपस्थितांना आश्वासन देताना सांगितले की, “ओटवणे येथील श्री देव रवळनाथ मंदिरासमोर सभामंडप उभारण्यासाठी जसे सहकार्य केले, तसेच येथेही सभामंडप उभारण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्यात येईल.” त्यांच्या या घोषणेनंतर उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.
कार्यक्रमाला भाजपा सोशल मीडिया प्रमुख केतन आजगांवकर, माजी पोलिस पाटील तुकाराम गावकर, ओटवणे हायस्कूलचे मुख्याध्यापक होडावडेकर सर, चेतन गावकर तसेच या उपक्रमासाठी विनामूल्य जागा उपलब्ध करून देणारे वैभव भानसे, धिरेंद्र म्हापसेकर, रामा गावकर, चंद्रकांत गावकर, विजय कविटकर, नारायण भानसे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर पुन्हा एकदा करण्यात आला.
