पिंगुळी ग्रा.प. चे आयोजन..
⚡कुडाळ ता.०५-: तालुक्यातील पिंगुळी ग्रामपंचायतच्या माध्यमातून पिंगुळी गावातील शेतकऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कृषि विषयक अभ्यास दौऱ्याचा शुभारंभ आज सरपंच अजय आकेरकर यांच्या हस्ते करण्यात आला. नाशिक, पुणे, बारामती, शेगाव सह पाच दिवसाचा हा कृषी अभ्यास दौरा आहे.
विदर्भातील शेगाव सह, नाशिक, पुणे, बारामती या भागातील शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून केलेली वाटचाल लक्षात घेता त्याला अनुसरून आपल्या भागात नवीन कृषी तंत्रज्ञान आत्मसात करावे, या उद्देशाने हा पाच दिवसाचा दौरा आहे. या पाच दिवसाच्या दौऱ्यात नाशिक, शेगाव, कर्जत, पुणे, बारामती असा नियोजित दौरा आहे. या दौऱ्यात पिंगुळी गावातून 23 शेतकऱ्यांचा समावेश आहे.
या शेती दौऱ्याचा उपयोग सर्व शेतकरी भविष्यात शेतीक्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून वाटचाल करणार आहेत. या दौऱ्याचा शुभारंभ पिंगुळी ग्रामपंचायत सरपंच अजय आकेरकर यांच्या हस्ते
करण्यात आला. ग्रामदैवत श्री देव रवळनाथ येथून या दौऱ्याला सुरुवात करण्यात आली. यावेळी पिंगुळी ग्रामपंचायत उपसरपंच मंगेश मसके, महेश पालकर, अरुण सावंत, राजन पांचाळ, जयवंत गावडे, बाबाजी दळवी, प्रमोद धुरी, सतीश धुरी, संदेश गावडे, गणेश शेटकर, प्रकाश सडवेलकर, बापू पिंगुळकर, विठ्ठल राऊळ, नामदेव पिगुळकर, निश्चय मसके, राजन मोर्ये, दिनकर सावंत, चिंतामणी सावंत, नरेंद्र बावलेकर, सोहम आकेरकर, सचिन गावडे, दशरथ सावंत उपस्थित होते.
