शंकर घारे:मायनींगसाठीचा सर्व्हे तात्काळ थांबविण्याची सौ. योगिता परब यांची मागणी..
⚡वेंगुर्ला ता.२२-: शासनामार्फत 11 मे ते 11 जून 2026 या कालावधीत मायनिंगसाठी वेंगुर्ला तालुक्यातील आरवली, आसोली, सखेलेखोल, सोन्सुरे, तसेच आजगाव आदी गावात ड्रोन द्वारे सर्व्हे करण्यात येत आहे.
ग्रामस्थांना विश्वासात न घेता संबंधित कंपनीमार्फत सर्व्हे करण्यात येत असून यास संबंधित ग्रामपंचायत मार्फत विरोध दर्शविण्यात आला असून संबंधित गावातील ग्रामस्थांचाही विरोध आहे. अशा प्रकल्प|मुळे येथील स्थानिक नागरिकांचे जनजीवन, सर्व प्रकारचे कृषी उत्पन्न याला धोका पोहचणार आहे. संबंधित ड्रोन सर्व्हे तात्काळ थांबविण्यात यावा, अशी मागणी शिरोडा पंचायत समिती सदस्य योगिता सिद्धेश परब यांनी आज(दि. 22 मे ) झालेल्या मासिक सभेत केली. याबाबत
मायनिंग प्रकल्प शासनाने जनतेच्या माथी मारू नये, असे सभापती शंकर घारे यांनी सूचित केले. वेंगुर्ला पंचायत समितीची मासिक सभा सभा शुक्रवारी 22 मे रोजी पं. स.सभापती शंकर घारे यांच्या अध्यक्षतेखाली बॅरिस्टर नाथ पै सभागृहात संपन्न झाली. यावेळी उपसभापती सचिन देसाई, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश पाटकर, आडेली पं. स. सदस्य नितीन मांजरेकर,आसोली पं. स.सदस्य संकेत धुरी,म्हापण पं. स. सदस्य आप्पी फणसेकर, तुळस पं. स. सदस्या सुचिता वजराटकर,उभादांडा पं. स. सदस्या साक्षी नार्वेकर, वायंगणी पं. स. सदस्या शितल राऊत,रेडी पं. स. सदस्या प्रियांका घाटवळ, शिरोडा पं. स. सदस्या योगिता परब तसेच विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानमध्ये वेंगुर्ला तालुक्यात तीन क्रमांकप्राप्त अणसुर, पेंडूर व परुळेबाजार इत्यादी ग्रामपंचायतींचे सभागृहात अभिनंदन करण्यात आले.
महाराष्ट्र वीज वितरण मार्फत राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट सोलार योजनेबाबत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सभागृहात माहिती दिली.इतर अनेक महत्वाच्या विषयावर संबंधित विभागाना सभापती शंकर घारे व उपसभापती सचिन देसाई यांनी कडक आदेश दिले आहेत.
