कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन..
⚡कणकवली ता.२२-: कडाक्याची थंडी व अवकाळी पाऊस यामुळे चालू वर्षी आंबा व काजू या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, कणकवली तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी अद्याप पंचनाम्यासाठी संपर्क केलेला नाही, त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी प्रवीण ओहोळ यांनी केले आहे.
शेतकऱ्यांनी सातबारा, आठ अ, बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक व फार्मर आयडी ही कागदपत्रे घेऊन संबंधित गावाचे सहाय्यक कृषी अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी अथवा ग्रामपंचायत अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
शासनाच्या निर्देशानुसार कणकवली तालुक्यात आंबा व काजू या दोन्ही पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू आहे. आतापर्यंत १२३३ हेक्टर क्षेत्रातील आंबा पिकांचे तसेच २३५५ हेक्टर क्षेत्रातील काजू पिकांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत.
अद्याप ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झालेले नाहीत, त्यांनी विलंब न करता संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा, असे स्पष्ट तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने केले आहे.
