नगरसेविका अँड नीता सावंत: 15 मे पर्यंत शहर चकाचक करणार म्हणून आश्वासन देणाऱ्या नगराध्यक्षांच काय झालं..?
सावंतवाडी : कामत नगर ते निंबाळकर पीठा परिसरातील गटार साफसफाईचा प्रश्न गंभीर बनला आहे. गटार तुंबल्याने परिसरात अस्वच्छता निर्माण झाली असून दुर्गंधी व आरोग्याच्या समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर नीता सावंत यांनी नगरपालिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
त्यांनी सांगितले की, सावंतवाडी येथील नगराध्यक्षांनी २४ एप्रिल २०२६ रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्वतः १५ मेपर्यंत शहरातील सर्व रस्ते सुस्थितीत करून रस्त्यांची कामे पूर्ववत केली जातील, असे आश्वासन दिले होते. मात्र त्या घोषणेनंतरही कामत नगर–निंबाळकर पीठा परिसरातील रस्ते व गटारांची स्थिती जैसे थे असल्याचा आरोप त्यांनी केला. “एमएनजीएलकडून गटार पाणीपुरवठा विभागाची जबाबदारी असल्याचे सांगितले जाते, तर पाणीपुरवठा विभाग एमएनजीएलकडे बोट दाखवतो. अशा परिस्थितीत नागरिकांनी नेमके काय करायचे?” असा थेट सवाल नीता सावंत यांनी उपस्थित केला आहे.
