तिरोडा येथील तलाव सुशोभीकरणाचा माजी खासदार विनायक राऊत यांनी घेतला आढावा…

⚡वेंगुर्ले ता.०२-: तिरोडा येथील श्री देवी माऊली मंदिर समोरील पुरातन तलाव सुशोभीकरण व दुरुस्ती कामाचा शुभारंभ माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या हस्ते मागील महिन्यात सुरेंद्र भोसले,सरपंच प्रियांका सावंत,उपसरपंच संदेश केरकर,
तिरोडा ग्रामविकास मंडळ,मुंबई अध्यक्ष नामदेव केरकर, माऊली देवस्थान कमिटी अध्यक्ष लक्ष्मण साळगावकर,माजी सरपंच विश्वनाथ आडारकर, ,ग्रामपंचायत सदस्य वृंदावनी गावडे,विश्रांती साळगावकर, पोलीस पाटील लवू रगजी , तंटा मुक्ती अध्यक्ष प्रविण केरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला होता.

देवी माऊली मंदिर समोर पुरातन तलाव असून या तलावाची दुरुस्ती व सुशोभीकरण करणे अत्यंत गरजेचे होते ,यासाठी माजी खासदार विनायक राऊत, माजी मंत्री प्रविणभाई भोंसले,आमदार शामभाई सावंत ,सुरेंद्र भोसले , नामदेव केरकर ,उमेश सावंत, विश्वनाथ आडारकर यांनी हा निधी मंजूर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

माजी खासदार विनायक राऊत यांनी सदरील तलावाचे सुरू असलेल्या या कामाची पाहणी करून मार्गदर्शक सूचना देत समाधान व्यक्त केले.

५० लाख रुपयांचे हे काम मंजूर असून या कामाला सुरुवात केल्याने ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात आले .
यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, रुपेश राऊळ, बाळा गावडे व अन्य शिवसेना पदाधिकारी तसेच तिरोडा सरपंच प्रियांका सावंत, उपसरपंच संदेश केरकर, सदस्य रत्नाकर आडारकर, सदस्या विश्रांती साळगांवकर, सुचित्रा जाधव, ग्रामविकास अधिकारी मुकुंद परब,श्री देवी माऊली देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती अध्यक्ष लक्ष्मण साळगांवकर, सचिव अनिल केरकर, सदस्य सुधाकर पेडणेकर, प्रवीण केरकर,संतोष पेडणेकर,नामदेव साळगांवकर,वामन शेणई, तिरोडा ग्रामविकास मंडळ मुंबई खजिनदार शरद गोडकर, पंढरीनाथ सावंत,पोलीस पाटील लवू रगजी,गंगाराम केरकर,महेश्वर केरकर,
पुरुषोत्तम शेणई,सामाजिक कार्यकर्ते दिनेश मयेकर,साबाजी मांजरेकर,ठेकेदार मच्छिंद्र तांडेल व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page