*💫कणकवली दि.२८- :* ग्रामपंचायत घोणसरी येथे “जिल्हा परिषद आदर्श गाव योजना व जलशक्ती योजना अंतर्गत “घर तिथे शोषखड्डा” या योजनेचा शुभारंभ जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.संजना सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य श्री. संजय आग्रे, पंचायत समिती सभापती श्री.मनोज रावराणे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, घोणसरी सरपंच सौ. मृणाल पारकर, उपसरपंच श्री. विलास मराठे ग्रामपंचायत विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, सदस्य श्री. प्रसाद राणे, सौ. सानिका जाधव, सौ. सायली जंगम, माजी सरपंच श्री. दीपक सावंत, श्री. आर. एल. शिंदे, सामाजिक कार्यकर्ते श्री. मकरंद पारकर, श्री.राजेश राणे (लोरे), श्री.अनिल राणे, लोरे सरपंच श्री. अजय रावराणे, उपस्थित होते. जिल्हा परिषद. अध्यक्ष सौ. संजना सावंत यांचा शाल,श्रीफळ, व पुष्पगुच्छ देऊन सत्कार व स्वागत सरपंच सौ. मृणाल मकरंद पारकर यांनी केले. सूत्रसंचालन व प्रास्ताविक ग्रामसेवक श्री.सिद्धेश गोसावी यांनी केले.
घोणसरी येथे घर तिथे शोषखड्डा योजनेचा संजना सावंत यांच्या हस्ते शुभारंभ
