घोषणा केलेल्या कर्जमाफीचे काय झाले ते आमदारांनी जाहीर करावे; पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडण्याची असते पक्षशिस्त
*💫कणकवली दि.०२-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत आणि बँक निवडणुकीत शिवसेनेने एवढी कामे केली असतील तर स्वबळावर लढण्याची हिंमत दाखवावी. निवडणुका जाहीर होण्याअगोदरच महा विकास आघाडी करुन निवडणुका लढवणार ही भूमिका शिवसेना खासदार व आमदार घेत आहेत. त्यातच सिंधुदुर्गात भाजपची ताकद वाढली आहे हे स्पष्ट होत आहे. ठाकरे सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही. केवळ घोषणा करुन जनतेची दिशाभूल सत्ताधारी करत आहेत. हिम्मत असेल तर शिवसेनेने सिंधुदुर्गात स्वबळावर निवडणुका लढवाव्यात असे खुले आव्हान भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिले आहे. कणकवली येथील भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ठाकरे सरकारला एक वर्षाचा कालावधी पूर्ण झल्यानंतर विरोधी पक्षाच्यावतीने सरकारच्या विरोधात संपूर्ण राज्यात पत्रकार परिषदा घेण्यात आल्या त्यानुसार पक्ष आदेशा प्रमाणे आ. रविंद्र चव्हाण कणकवलीत पत्रकार परिषद केली. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातही माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनीही त्यादिवशी पत्रकार परिषद घेतली सरकार का एक वर्षाचा कालावधी पूर्ण करत असताना जनतेची कशी दिशाभूल केली याबाबत त्यात माहिती देण्यात आली.माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे वरीष्ठ नेते आहेत.आ.रवींद्र चव्हाण सरचिटणीस आहेत.राज्यात जी जबाबदारी दिली ती पार भाजपच्या पक्षशिस्ती नुसार पाळली जाते.नारायण राणे यांनी रत्नागिरी येथे पत्रकार परिषद घेतली. त्यात कुणाचे नेतृत्व यासंदर्भात प्रश्न उद्भवत नाही,आमदार वैभव नाईक यांनी चुकीचे मुद्दे चर्चेत हाणून कोणताही फरक पडणार नसल्याचे राजन तेली यांनी सांगितले. एसटीचे ३०० चालक जातात,मुबंईला जात आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एसटी वाहतुकीवर मोठा परिणाम होत आहे .हे जाणारे कर्मचारी असल्याने ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला परिणाम भोगावे लागत आहेत.एक आठवड्यात सर्व फेऱ्या सुरु न केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील.आमदारांकडे आलिशान गाडया आहेत.पण एसटीने गोरगरीब नागरिकांना व विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागतो. शाळा,विद्यालयात व अन्य लोक एसटीने येत आहेत. सातत्याने एसटीचे प्रश्न का निर्माण होत आहेत ?शिवसेना मंत्री सक्षम नाहीत का? येथे कर्मचाऱ्यांना पगार दिले जात नाही याला जबाबदार कोण हे आमदार वैभव नाही यांनी सांगावे असे आव्हान राजन तेली यांनी दिले आहे.तसेच एसटीचे नवीन स्टँडची भूमिपूजने केले ती कामे झालीत का? असा सवालही त्यांनी केला आहे. माजी पालकमंत्री यांनी निवडणूकीच्या तोंडावर काही भूमिपूजने केली होती ,त्या ठिकाणी दगड लावला काय?तुमच्यावर विश्वास कोण ठेवणार? शिवसेना जिल्ह्यात पूर्णपणे अपयशी ठरली आहे सत्ता असूनही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना न्याय मिळत नाही आरोग्य सेवा कोलमडली आहे शेकडो पदे रिक्त असताना शिवसेना मुख्यमंत्री असून देखील जनतेला न्याय मिळत नसल्याचे दिसून येत आहे.मात्र त्याउलट प्राथमिक आरोग्य केंद्र २२७ आहेत. त्या माध्यमातून जिल्हा परिषदेचे आरोग्य कर्मचारी घरोघरी पोहोचले आहे .जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी पोहचले.तुम्ही काय केले? नुकसानभरपाईचे ६५ कोटी फडणवीस काळातील पैसे मंजूर झालेले होते. जिल्ह्याचा आराखडा अडीचशे कोटीचा होता तो जिल्हा नियोजन आराखडा १४० कोटींवर आणला.प्रशासन चालवताना थट्टा चालवली. मेडिकल कॉलेज चालू केल्यास आम्ही भाजपच्या वतीने जाहीर सत्कार करु,केवळ घोषणा ठरु नये.जिल्हा आरोग्य विभागात ५३६ रिक्त पदे आहेत ती अगोदर भरा. सिव्हील सर्जनची एक महिन्याच्या आत बदली कशी?बदलाची कामे हे सरकार करत असल्याचा आरोप राजन तेली यांनी केला. कर्जमाफीचे काय झाले?लोकांना पैसे मिळाले नाही.सरकारवर ५ .२ लाख हजार कोटीचे कर्ज आहे .महसुली तूट ३५ हजार कोटी झाली आहे.भात नुकसानभरपाई पैसे आले नाहीत.केवळ हवेत गोळीबार नको. ठाकरे सरकारने जाहीर केलेल्या घोषणा केवळ हवेत नको तर प्रत्यक्षात जनतेला पर्यंत सत्ताधारी शिवसेनेच्या आमदारांनी याव्यात अशी मागणी देखील राजन तेली यांनी केली आहे.