नवनिर्वाचित आमदार प्रमोद जठार ७ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर..

सावंतवाडी मतदारसंघात होणार जंगी स्वागत: महेश सारंग यांची माहिती..

⚡सावंतवाडी, ता.०४-: नवनिर्वाचित विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार हे येत्या ७ तारखेला सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांच्या स्वागतासाठी भाजप कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जिल्ह्यातील विविध ठिकाणी त्यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे.
या दौऱ्याची सुरुवात सकाळी १० वाजता दोडामार्ग येथून होणार असून त्यानंतर सकाळी 11 वाजत सावंतवाडी येथे त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. पुढे दुपारी एक वाजता वेंगुर्ले येथे तर सायंकाळी चार वाजता कुडाळ येथे भव्य स्वागत तर सायंकाळी सहा वाजता मालवण येथे सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
भाजप जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी याबाबत माहिती दिली असून, सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. या दौऱ्यादरम्यान आमदार जठार कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

You cannot copy content of this page