बारावी निकालात कणकवली तालुक्याची बाजी…

प्रतीक्षा पाटील, सुकन्या राणे आणि दिया प्रभुदेसाई तालुक्यातून टॉप..

⚡कणकवली ता.०२-:
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या बारावीच्या निकालात कणकवली तालुक्याने घवघवीत यश संपादन केले आहे. या निकालात कणकवली कॉलेजची वाणिज्य शाखेची विद्यार्थीनी प्रतीक्षा संजय पाटील हिने ९२.८३% गुण मिळवून तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. तसेच विज्ञान शाखेतील सुकन्या संजय राणे ९१.६७% गुणांसह द्वितीय, आयडियल इंग्लिश ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे, कणकवली ची विद्यार्थिनी दिया जयराम प्रभुदेसाई हिने ९१.१७% गुण मिळवून तृतीय
क्रमांक मिळवला आहे. कणकवली तालुक्यातून १८०५ विद्यार्थी परीक्षेत सहभागी झाले होते पैकी १७३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये ९२१ मुले तर ८११ मुली समाविष्ट झाल्या होत्या.

विज्ञान, वाणिज्य आणि कला अशा तिन्ही शाखांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्तम यश मिळवले असून, अनेक ग्रामीण भागातील विद्यालयांनीही निकालात बाजी मारली आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि गुणवंतांचे तालुक्यातून कौतुक होत आहे. कणकवली तालुक्याचा एकूण निकाल ९५.९५ % लागला आहे.

कणकवली तालुक्यातील निकाल पुढीलप्रमाणे-

१) कणकवली कॉलेज कणकवली – विज्ञान शाखा : १) कु. सुकन्या संजय राणे (९१.६७%), २) कु. सोहम संजय परब (९०%), ३) कु. पूर्वा महादेव प्रभूदेसाई ( ८९.३३%). वाणिज्य शाखा : १) कु. प्रतीक्षा संजय पाटील (९२.८३%), २) कु. अदिती दामोदर खानोलकर(९०.८३%), ३) राज स्वप्निल वळंजू (९०.५०%). कला शाखा : १) कु. सई सूर्यकांत सावंत (८९.५०%), कु. सर्वेश सचिन शिरसाठ (८७.५०%), कु. मनस्वी यतीन देसाई (८४.६७%), व्यावसायिक अभ्यासक्रम : १) कु. मेहेक प्रमोद चव्हाण (८९.५०%), २) माही प्रमोद चव्हाण (८८.३६%), ३) कु. कुबेर विश्वनाथ पाटील (८०.५०%).

२) वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, तळेरे – विज्ञान शाखा : १) कु. चैताली प्रकाश तळेकर (६३.८३%), २) कु. श्रावणी संदीप तळेकर (६१.५०%), निशांत विजय घाडी (६१.३३%). वाणिज्य शाखा : १) सांजल संदीप भोवड (८०.८३%), २) कु. समिक्षा संतोष पाटणकर (७१.६७%), ३)तनिष्का संदीप बांदिवडेकर (६६.३३%). कला शाखा : १) कु. खुशी प्रणव पानवाला (६१.००%), २) समिआ तारिक हुना (६०%), ३) वेदांत रघुनाथ तानवडे (५५.६७%).

३) न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, व्होकेशनल अँड सायन्स फोंडाघाट – कला शाखा : १) कु. जानवी रवींद्र पाटील (७७.५०%), २) कु.भूमिका दिगंबर पानकर (७७.१७%), ३) गायत्री उमेश सुतार (७७%). वाणिज्य शाखा : १) कु. कोमल केशव गोसावी (८०.५०%), २) कु. समाधान गजानन सावंत (७८.१७%), ३) कु. कोमल रावजी गायकवाड (७५.३३%). व्होकेशनल शाखा : १) कु. वैष्णवी दशरथ जोईल (७६.३३%), २) कु. समृद्धी संतोष रासम (७०.१७%), ३) कु. मोनिका विजय राठोड (७०%). विज्ञान शाखा : १) कु. गायत्री विजयकुमार राठोड ७३.८३%), २) कु. अथर्व नारायण राणे (६९.८३%), ३) कु. नंदिनी कृपाल चौहान (६५.३३%).

४) आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स, वरवडे – विज्ञान शाखा : १) कु. दिया जयराम प्रभूदेसाई (९१.१७%), २) निखिल सचिन सावंत (८९.६७%), ३) सबुरी मंगेश नानचे (८५.१७%). वाणिज्य शाखा : १) कु.आस्था योगेश सामंत (८०.५%), २) कु. अनुश्री विजय मापसेकर (७६.६७%), ३) कु. अजित रवींद्र कोळी (७२.३३%).

५) श्री मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स कनेडी, कणकवली – विज्ञान शाखा : १) कु. प्राजक्ता ज्ञानेश्वर गोडस (७५%), २) कु. पियुशा मधुकर सावंत (६८.८३%), ३) सानिका संतोष पांगम (६७.३३%). वाणिज्य शाखा : १) कु. फतिमा सलीम मेस्त्री (८८.६७%), २) कु. श्रावणी मंगेश म्हसकर (८५%), ३) सरिता सुनील सावंत (८४.६७%). कला शाखा :
१) कु. आर्या कालिदास भाटवडेकर (८३.३३%), २) कु. मंथन मधुकर शिंदे (६९.५०%), ३) कु. प्रसाद संतोष सलाम ( ६८.१७%).

६) कासार्डे जुनियर कॉलेज कासार्डे, कणकवली – कला शाखा : १) कु. तन्वी दीपक साईम (५८.८३%), २) कु. तुषार अजय पाताडे ( ५२.८३%), ३) कु. पूजा बाळकृष्ण आयरे ( ५०.८३%). वाणिज्य शाखा : १) कु. आर्यन विलास लाड ( ८८.३३%), २) कु. रश्मी संतोष वळंजू ( ८३.३३%), ३) कु. रोहिणी नामदेव सोमले ( ८३.१७%). विज्ञान शाखा : १) कु. आरती विजय भाट
(६३.५०%), २) कु. आर्यन गणेश गिरकर ( ६०%), ३) कु. हर्ष सुरेश मांजरेकर ( ५९.१७%).

७) एस एम हायस्कूल कणकवली – विज्ञान शाखा : १) कु. तन्वी शैलेंद्र कांबळे ( ६५.१७%), २) कु. अथर्व अंकुश सदडेकर (६३.३३%), ३) कु. ययाती सत्यवान पावसकर (५७.१७%). एमसीव्हीसी शाखा : १) कु. किशोरी कृष्णा होळकर (६८.६७%), २) कु. गायत्री सूर्यकांत वारंग (६७.८३%), ३) कु. सायली गुरुदास परब ( ६६.१७%). कॉमर्स शाखा : १) कु. सोनम संदीप घाडीगावकर (७७.८३%), २) कु. पूर्वा बाबाजी घाडीगावकर (७६.६७%), ३) कु. प्राजक्ता आत्माराम तेली ( ७६.६७%).

८) ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स कळसुली, कणकवली – वाणिज्य शाखा : १) कु. रसिका नंदन गावकर ( ८५.३३%), २) कु. प्राची महेश देसाई (८४.८३%), ३) सारथी सुनील भोगले (८०.५०%). कला शाखा : १) कु. निधी विजय पालव (५९%), २) कु. नितीश विष्णू पाटकर ( ५५.१७%), ३) कु. प्रशांत प्रकाश कासले ( ५४.६७%).

९) ब्राह्मणेश्वर शैक्षणिक सामाजिक उन्नती मंडळ फोंडाघाट संचलित कै. राजाराम मराठे उच्च माध्यमिक विद्यालय, फोंडाघाट – विज्ञान शाखा : १) कु. तन्वी भीमराव प्रभावळकर (६८.५०%), २) कु. रुद्रा ओमप्रकाश रासम ( ६१.६७%), ३) कु. सेजल सुहास रासम (६१.३३%).

१०) शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण – विज्ञान शाखा : १) कु. तेहसीन मुरताक अ. पटेल (७९.६७%), २) कु. उक्बा अ. गफार काझी (७५.५०%), ३) कु. महाविश इरफान मुल्ला (७४.३३%). कला शाखा : १) कु. दुर्गेश पांडुरंग पवार (६३.३३%) २)कु. प्रतीक नारायण धुरी (६२.५०%), ३) कु.आशा बबन पुरीगोसावी (५६.३३%). कॉमर्स शाखा : १) कु. राजेश चंद्रकांत गोसावी (८२.८३%), २) कु. विद्या मारुती कुडाळकर (८१.८३%), ३) कु. साक्षी विजय शिरकर ( ७३.५०%). इले. टेक्नॉ. १) कु. विघ्नेश मुरलीधर शिवणेकर ( ५५.६७%). ऑटो. टेक्नॉ. १) कु. संस्कार संतोष मांडवकर ( ७६.८३%).

११) माध्यमिक विद्यालय व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय बिडवाडी – वाणिज्य शाखा : १) कु. मानसी मंगेश राणे ( ७४.८३%), २) कु. अश्विनी संतोष ठुकरुल (७३.१७%), ३) कु. समीक्षा संदीप राणे ( ६७.८३%).

यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page