⚡सावंतवाडी ता.०२-: आजगाव येथील श्री देव वेतोबा मूर्तीच्या पुन : प्रतिष्ठापनेचा ५० वा वर्धापन दिन ४ मे पासून या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार ४ रोजी सायंकाळी वाजता मिरवणूअकीसरहित वाजत गाजत गणेशमूर्तीचे आगमन मंगळवार ५ रोजी सकाळी गणेशमूर्ती प्राण प्रतिष्ठापना,७ ते १.३० वाजता पुण्याहवाचन,आचार्य कर्म प्राकारशुध्दी,महापूजा प्रारंभ,महान्यासपूर्वक महारुद्र अभिषेक,आरती महाप्रसाद,सायंकाळी ५ वाजता बुवा- दिप्तेश मेस्री (अणसूर)यांचे अंभग गायन,सायंकाळी ६.३० वाजता श्री गणेश माऊली संगीत ग्रुप प्रस्तुत भावेश राणे रेडी यांचे स्वर संगम,सायंकाळी ७.३० वाजता लिंगेश्वर पावणाई प्रासादिक भजन मंडळ,कणकवली बुवा – योगेश मेस्री यांचे भजन,रात्री ९.३० वाजता श्री वावळेश्वर दशावतार नाट्य मंडळ,तेंडोली,यांचे ‘ नरकुंजर वक्रतुंड ‘ हा नाट्यप्रयोग,बुधवार ६ मे रोजी सकाळी ७ ते १.३० वाजता मंगलाचरण शांतीपाठ महान्यासपूर्वक,महारुद्र अभिषेक,आरती महाप्रसाद सायंकाळी ५ वाजता कमळेश्वर भजन मंडळ,कोरगाव गोवा बुवा – हनुमंत शेटगावकर यांचे भजन,सायंकाळी ६.३० वाजता साई दामोदर कला मंडळ,मडगाव गोवा बुवा – शुभम नाईक यांचे भजन,रात्री ९.३० वाजता अजय गौतम प्रस्तुत ऑर्केस्ट्रा सिंधु स्टार सिंधुदुर्ग यांचे गायन नृत्य लावणी,गुरुवार ७ मे रोजी सकाळी ७ ते १.३० वाजता अग्निस्थापना रुद्रयंत्र व ग्रहमंडल स्थापना ग्रह होम,लघुरुद्र स्वाहाकार बलिदान,पूर्णाहूती,अभिषेक,उत्तरांगकर्म,आरती,गाऱ्हाणे,महाप्रसाद,सायंकाळी ५ वाजता ह.भ.प.श्री चिंतामणी सामंत यांचे किर्तन,सायंकाळी ८ वाजता गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ,वडखोल वेंगुर्ला बुवा – रुपेंद्र परब यांचे भजन,रात्री १० वाजता साई कला मंच पिंगुळी कुडाळ प्रस्तुत यांचे ‘ रंगी रंगला महाराष्ट्र ‘ शुक्रवार ८ मे रोजी पहाटे ४.३० ते ६.३० वाजता धार्मिक विधी वर्धापन दिन सोहळा आरती,तीर्थप्रसाद,दुपारी १.३० वाजता महाप्रसाद,सायंकाळी ५ वाजता ‘स्वरभगिनी ‘ भक्तीगीते नाट्यगीते,रात्री ९ वाजता पालखी मिरवणूक,रात्री १० वाजता नवोदित कला मंडळ,भोमवाडी आयोजित नाट्यप्रयोग,शनिवार ९ मे रोजी सकाळी १० वाजता सत्यनारायण महापूजा,दुपारी १ वाजता महाआरती,दुपारी १.३० वाजता महाप्रसाद,सायंकाळी ४ वाजता भजन,सायंकाळी ६ वाजता किर्तन,रात्री १० वाजता सांस्कृतिक मनोरंजनाचा कार्यक्रम,सोमवार ११ मे रोजी दुपारी १ वाजता महाआरती,दुपारी १.३० वाजता महाप्रसाद,सायंकाळी ४ वाजता आजगाव ग्रामस्थ यांचे भजन व आरती,सायंकाळी ५ वाजता गणेशमूर्ती मिरवणूकीसहित विसर्जन होणार आहे.
आजगाव येथे ४ मे पासून श्री देव वेतोबाचा मूर्ती प्रतिष्ठापनेचा ५० वा वर्धापन दिन सोहळा…
