सावंतवाडी तालुक्याचा १२ वीचा निकाल ९३.१२ टक्के…

आरपीडीचा दत्तराज पै तालुक्यात प्रथम ; आरपीडीचा निकालात डंका..

सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाधिकारी मंडळाचा सावंतवाडी तालुक्याचा बारावीचा एकूण निकाल ९३.१२ टक्के एवढा लागला आहे. तालुक्यातून बारावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या एकूण १५४२ विद्यार्थ्यांपैकी १४३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात आरपीडीचा दत्तराज शैलेश पै (वाणिज्य शाखा ) हा तालुक्यात प्रथम तर आरपीडीचीच हर्षदा कासार (कला शाखा) द्वितीय तर वाणिज्य शाखेचे निधी साटेलकर, चिन्मय असणकर व मानस कोलते यांनी विभागून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.

श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचा विज्ञान, वाणिज्य व कला शाखेचा १२ वीचा निकाल ९१.९१ टक्के लागला असून प्रशालेतून शिवम मगदूम ८४ टक्के प्रथम, द्वितीय मधूरा सावंत ८३.३३ टक्के तर तृतीय क्रमांक अमोल दळवी ८१.१७ टक्के याने प्राप्त केला आहे.

सावंतवाडी येथील आर.पी.डी. ज्युनियर कॉलेजने यश संपादन केले आहे. कॉलेजचा एकूण निकाल ९५.४६ टक्के लागला असून, विशेष म्हणजे विज्ञान शाखेने १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. प्रशालेतून ९५ टक्के गुणांसह दत्तराज शैलेश पै प्रथम ठरला आहे‌. द्वितीय हर्षदा कासार ९२.६७ टक्के द्वितीय तर तृतीय क्रमांक ९२.१७ टक्के गुणांसह विभागून निधी साटेलकर, चिन्मय असणकर, मानस कोलते यांनी प्राप्त केला आहे.

सावंतवाडी येथील कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय. बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालयाचा एकूण निकाल ६८.५७ टक्के लागला. प्रशालेतून वैष्णवी वैद्य हीने ७३.३३ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक प्राप्त केला. द्वितीय क्रमांक चिन्मयी सदानंद जोशी ७१.३३ टक्के तर तृतीय क्रमांक गायत्री भिकाजी मेस्त्री ६९.१७ टक्के हीने प्राप्त केला.

मिलाग्रीस ज्युनियर कॉलेजने उच्च माध्यमिक महाविद्यालयाचा १०० टक्के लागला असून प्रशालेतून मोहम्मद अफाग नियाज नाईक ९१.३३ टक्के प्रथम क्रमांक प्राप्त केला असून द्वितीय रॉक्सन डॉमनिक डिसोजा ७९ टक्के तर तृतीय कुमारी आमना नसीर गवंडी हिने ७५.५० हीने प्राप्त केला आहे.

तळवडे येथीलं श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा एकूण निकाल ७५ टक्के लागला असून प्रियांका आनंद भागवत हिने ९०.८३ टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे. द्वितीय क्रमांक
कु. वैष्णवी आनंद रेडकर ६७.५० टक्के तर तृतीय क्रमांक कु. श्रेया पंढरीनाथ रेडकर ५७ टक्के गुण मिळविले.

आरोस येथील विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा एकूण निकाल ९२.०३ टक्छे लागला असून,
यात कुमा. अनुश्री आल्हाद नाईक हिने ८०.५० टक्के गुणांसह महाविद्यालयात प्रथम, कुमा.रेश्मा कृष्णा लमाणी ७२.६७ टक्के गुणांसह द्वितीय, तर कुमा.श्रेया रामदास नाईक ७१ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली.

‘चौकुळ इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज’ने १०० निकालाची परंपरा कायम राखली आहे. प्रशालेतून कु. वैभवी गावडे ८४ टक्के प्रथम, द्वितीय कु. रिया गावडे ७७ टक्के, तृतीय संतोषी राऊत ७४ टक्के हीने प्राप्त केला आहे.

नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा बारावीचा वाणिज्य शाखेचा १०० टक्के लागला. प्रशालेतून सर्वेश होडावडेकर ७८ टक्के गुण प्राप्त करून प्रथम, द्वितीय निधी धुरी ७६.१७ टक्के तर तृतीय कनिष्क नाईक ७०.३३ टक्के गुणांसह तृतीय आला आहे.

धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित बांदा येथील खेमराज मेमोरिअल इंग्लिश स्कूल व डॉ. व्ही. के. तोरसकर कनिष्ठ महाविद्यालयाने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (१२ वी ) परीक्षेत आपल्या यशाची परंपरा कायम राखली आहे. या महाविद्यालयाचा एकूण निकाल ९४.८२ टक्के लागला असून, गंधाली प्रशांत धुरी हिने ८५ टक्के गुण मिळवून प्रशालेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. द्वितीय सोनाली तुकाराम हरमलकर ८४.८३ टक्के तर विग्नेश विष्णू मळगांवकर ८३.६७ टक्के सह तृतीय क्रमांक पटकावला आहे.

माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सांगेली या प्रशालेचा निकाल ८९.१० टक्के लागला असून यात प्रथम यज्ञेश सावंत ८९.३३, द्वितीय सौजन्य घाटकर ८६.३३ तर स्वरांगी आंगचेकर ८३ टक्के गुणांसह प्रशालेतून तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली आहे. तर सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीचा निकाल ९७.५० टक्के एवढा लागला आहे‌.

You cannot copy content of this page