⚡देवगड ता.०२-: देवगड जामसंडे शहर विकास समन्वय समिती सदस्यांनच्या वतीने पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन शहरातील विविध विकास कामाविषयी सकारात्मक चर्चा करण्यात आली.यावेळी देवगड जामसंडे शहर विकास समन्वय समितीचे काही सदस्य यांनी पालकमंत्री राणे यांची भेट घेऊन अपूर्ण असलेली कामे व प्रलंबित कामे याबाबत चर्चा करून शहराला तातडीने आवश्यक असणाऱ्या सोयीन बद्दल मागणी यावेळी केलीआहे.या वेळी पालकमंत्र्यांनीही समितीच्या कामाची प्रशंसा करत त्यांच्या या कामाच कौतुक केले व समितीने अशा प्रकारे वारंवार विकास कामे सुचवावी अशी इच्छा यावेळी व्यक्त केली तसेच ती कामे आम्ही तातडीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही देखील यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली. देवगड जामसंडे शहर विकास समन्वय समितीच्या प्रमुख मागण्यांमध्ये या देवगड जामसंडे नगरपंचायतीसाठी कायमस्वरूपी मुख्याधिकारी उपलब्ध करून देणे तसेच कोरली सातेडी नवीन नळपाणी योजना, शहराला प्रामुख्याने भेडसावणारे सांडपाणी गटार योजना , तसेच नवीन रस्ते व जुने रस्ते दुरुस्ती , वॉर्ड नंबर 11 मधील गटाराचे तातडीने काम मार्गी लावणे ,शहराला सुसज्ज असे मच्छी मार्केट उपलब्ध करून देणे, रखडलेला आनंदवाडी प्रकल्प लवकरात लवकर पूर्णत्वासनेने याविषयी प्रामुख्याने मागणी यावेळी देवगड जामसंडे शहर विकास समंदर समितीच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच विविध प्रश्नांवर चर्चा करून शहरासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींची माहिती पालकमंत्र्यांना समितीद्वारे देण्यात आली आहे.
समितीनेही पालकमंत्री नितेश राणे यांनी वारंवार समितीला दिलेल्या सहकाराबद्दल आभार व्यक्त केले.
यावेळी समन्वय समितीच्या शामलजोशी,अण्णा खवळे,
सुधीर मांजरेकर,राजेंद्र मिस्त्री,राजेंद्र राणे,शरद लाड
स्वप्निल कुबल आदी उपस्थित होते.
देवगड जामसंडे समन्वय समिती च्या सदस्यांनी घेतली पालकमंत्री नितेश राणे यांची भेट…
