⚡देवगड ता.०२-:
फणसे येथील समुद्रात नांगर टाकून उभ्या केलेल्या नौकेवरून मोंड झरकरवाडी येथील सुरज सूर्यकांत आचरेकर (वय 30) हा खलाशी बेपत्ता झाला आहे. ही घटना 1 मे रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देवगड तालुक्यातील बन्सी नावाच्या मच्छिमारी नौकेवर मोंड झरकरवाडी येथील सुरज आचरेकर हा खलाशी म्हणून कामाला होता. १ मे रोजी रात्री १२ वा. ते पहाटे ५ वा. या कालावधीत फणसे येथील समुद्रात बन्सी ही नौका नांगर टाकून उभी केलेली असताना या नौकेवरील खलाशी सुरज आचरेकर हा बेपत्ता झाला आहे. त्याचा शोध घेण्यात आला. मात्र तो सापडला नाही. त्यामुळे तो बेपत्ता असल्याची तक्रार हितेश संजय हरम (२६) रा. देवगड किल्ला यांनी देवगड पोलिसात दिली आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस हवालदार आशिष कदम करत आहेत.
फोटो आहे
