आरोस ग्रामस्थांचे रस्त्याबाबतचे आमरण उपोषण अखेर स्थगित…

संबंधितांनी २० मे पर्यंत काम पूर्ण करण्याची ग्वाही दिल्याने उपोषण तात्पुरत्या स्वरूपात स्थगित..

⚡सावंतवाडी ता.०२-: २० मे पर्यंत काम करण्याचे लेखी आश्वासन घेऊनच तात्पुरत्या स्वरूपात आरोस ग्रामस्थांचे रस्त्याबाबतचे उपोषण स्थगित करण्यात आले.
आरोस येथील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील “साटेली मुख्य रस्ता ते कळंगुटकरवाडी” रस्त्याच्या अक्षम्य दिरंगाईबाबत ,आरोस येथील सामाजिक जेष्ठ कार्यकर्ते सुरेश देसाई व ग्रामस्थांनी, १ मे रोजी आरोस ग्रामपंचायत येथे रस्त्याबाबत यथायोग्य मागण्यासाठी ” आमरण उपोषण” , सुरू केले होते,जो पर्यंत संबंधित मागण्या पूर्ण होत नाहीत , तो पर्यंत आमरण उपोषण करणार असल्याचे श्री देसाई व ग्रामस्थांनी सांगितले.
मात्र संबंधित अधिकारी उपोषण स्थळी दाखल होताच येथील ग्रामस्थांनी,पदाधिकाऱ्यांनी त्यांना धारेवर धरत , रस्ता कामाबाबत प्रश्न उपस्थित केले. तालुका प्रमुख (उबाठा) राजू शेटकर यांनी उपोषण स्थळी भेट देत,संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून घटनेची माहिती देत,जाब विचारला.प्रशासक शंकर नाईक यांनी सुद्धा अधिकारी ठेकेदार यांना घटनास्थळी येऊन उपोषण कर्त्यांच्या मागण्यांवर बोलण्यास सांगितले.
यावेळी मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन ग्रामस्थांपुढे नमते घेत,सदरील रस्त्याचे काम २० मे पर्यंत करू.असे लेखी स्वरूपात आश्र्वासन दिले.त्यावेळी येथील ग्रामस्थांनी उपोषण तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केल्याचे जाहीर केले.
यावेळी जेष्ठ कार्यकर्ते तथा सुरेश देसाई, तालुका प्रमुख (उबाठा) राजू शेटकर, प्रशासक शंकर नाईक ,ग्रामपंचायत सदस्य विश्वजीत कळंगुटकर, पोलीस पाटील महेश आरोसकर, बाळू कुबल ,निखिल नाईक, महेश कुबल, सिद्धेश कुबल ,सुहास कोरगावकर, गुरुनाथ नाईक, तंटामुक्त अध्यक्ष राजन नाईक, रमाकांत कळंगुटकर, नाना नाईक , सातार्डा पोलीस कॉन्स्टेबल सुभाष नाईक तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कनिष्ठ अभियंता राजाराम धर्णे, उप अभियंता जी. एस.सावंत, ठेकेदार राजु चव्हाण यांचे प्रतिनिधी ऋत्विक घाग यांचे लेखी आश्वासन घेऊनच हे रस्त्याबाबतचे उपोषण तात्पुरत्या स्वरूपात सामोपचाराने स्थगित करण्यात आले.

You cannot copy content of this page