बा.म. गोगटे कनिष्ठ महाविदयालय शिरोडाची गायत्री लक्ष्मण वारगावकर तालुक्यात प्रथम..
⚡वेंगुर्ला ता.०२-: फेब्रुवारी 2026 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (बारावीचा )
वेंगुर्ला तालुक्याचा बारावी परीक्षा 2026 चा ऑनलाईन निकाल आज शनिवारी 2 मे रोजी जाहीर झाला आहे.तालुक्यातील एकूण 4 कॉलेजमधील एकूण 641
प्रविष्ठ विद्यार्थ्यांपैकी 628
विद्यार्थी उत्तीर्ण होऊन तालुक्याचा निकाल 97.97
टक्के इतका लागला आहे. यामध्ये बा.म. गोगटे कनिष्ठ महाविदयालय शिरोडा ची
एम. सी. व्ही. सी. शाखेची विद्यार्थिनी गायत्री लक्ष्मण वारगावकर हिने ९० टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविण्याचा मान मिळविला आहे. बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ला च्या वाणिज्य शाखेचा विद्यार्थी पुष्कर विजय पेडणेकर याने 87.33 टक्के गुण मिळवून तालुक्यात द्वितीय क्रमांक व बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ला च्या
विज्ञान शाखेची विद्यार्थिनी स्नेहा राजन नार्वेकर हिने ८५.३३ टक्के गुण मिळवून तालुक्यात तृतीय येण्याचा मान मिळविला आहे.खर्डेकर कॉलेजच्या वाणिज्य शाखेच्या मृण्मयी दिनकर परब हिने 85 टक्के गुण मिळवून तालुक्यात 4 था क्रमांक व शिरोडा कॉलेजच्या विज्ञान शाखेच्या सलोनी नितिन बागवे हिने
८३.६७ टक्के मिळवून तालुक्यात 5 वा क्रमांक मिळविला आहे.श्री देवी सातेरी हायस्कूल व कै. सौ. गुलाबताई दिनानाथ नाईक कनिष्ठ महाविद्यालय वेतोरे
निकाल 100 टक्के इतका लागला असून एकूण प्रविष्ठ 106 विद्यार्थ्यांपैकी 106 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
रा.कृ पाटकर हायस्कूत आणि रा-सी. रेगे कनिष्ठ महाविदयालय वेंगुर्ला
या महाविद्यालतील एकूण 3 विभागातील एकूण प्रविष्ठ 41 विद्यार्थ्यांपैकी 41 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल 100 टक्के लागला आहे.
बा.म. गोगटे कनिष्ठ महाविदयालय शिरोडा एकूण 237 प्रविष्ठ विद्यार्थ्यापैकी 234 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन
९८.७३ टक्के इतका निकाल लागला आहे.
बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ला निकाल ९६.११ टक्के लागला असून एकूण २५७ प्रविष्ठ विद्यार्थ्यापैकी २४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर, सचिव प्रा. जयकुमार देसाई , चेअरमन डॉ. सो. मंजिरी मोरे, पेट्रन कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई, प्रशासन अधिकारी पृथ्वी मोरे,प्राचार्य डॉ.डी. बी. गोस्वामी, पर्यवेक्षक, कार्यालयीन अधीक्षक, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
