शेर्ले येथे तेरेखोल नदीकाठी गणेश घाटाचे संजू परब यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न…!

⚡बांदा,ता.०२-:
शेर्ले येथील तेरेखोल नदी परिसरात गणेश घाट बांधकामाच्या कामाचा शुभारंभ उत्साहात पार पडला. या कामाचे भूमिपूजन शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी पंचायत समिती सदस्य महेश धुरी, सरपंच सौ. प्रांजल जाधव, माजी सरपंच उदय धुरी, दयानंद धुरी, उपसरपंच दीपक नाईक, ग्रामपंचायत सदस्य श्रावणी धुरी, वासुदेव धुरी, गुरु सावंत, युवासेना तालुकाप्रमुख रियाज खान, मागासवर्गीय सेल युवा तालुका प्रमुख प्रशांत जाधव, तसेच सागर धुरी, नितीन जोशी, बाळा धुरी, विनोद सावंत यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या गणेश घाटामुळे परिसरातील नागरिकांना मोठी सुविधा उपलब्ध होणार असून धार्मिक व सामाजिक उपक्रमांसाठीही या घाटाचा उपयोग होणार आहे. ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले.

You cannot copy content of this page