टेबे स्वामी पादुका मंदिराचा ११० वा वर्धापन दिन सोहळा आज

⚡सावंतवाडी ता.२८-: सबनीसवाडा येथील श्री एकमुखी दत्त मंदिर व श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी मंदिर यांच्यावतीने श्री टेबे स्वामी पादुका मंदिराचा ११० वा वर्धापन दिन सोहळा आज मंगळवार, २८ एप्रिल रोजी भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात येणार आहे.

श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांच्या पादुकांची स्थापना असलेल्या या मंदिराचा वर्धापन दिन दरवर्षी मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळच्या धार्मिक कार्यक्रमानंतर दुपारी १२.३० वा. – श्रींची महाआरती, दुपारी १.३० ते ३.३० – महाप्रसाद, सायंकाळी ४.०० वा. – तीर्थप्रसाद, सायंकाळी ६.३० वा. – श्रींची आरती, सायंकाळी ८.०० वा. – श्री देवस्वामी महाराज पालखी सोहळा, रात्री ९.०० वा. – स्थानिक भजन मंडळांचे सुमधुर भजन आदी कार्यक्रम होणार आहेत. या पवित्र सोहळ्यास उपस्थित राहून भाविकांनी श्री स्वामींच्या पादुकांचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page