श्री देवी माऊलीची पालखी व बारा पंचायतन देवतांची भेट याची आठवण म्हणून धार्मिक विधी सोहळा
⚡वेंगुर्ले ता.२८-: श्री कुळकार मंदिर, रेडी गावतळेवाडी येथे आज मंगळवार दि. २८ एप्रिल रोजी “श्री देव कुळकार मंदिराचा वर्धापन दिन सोहळा” मोठ्या उत्साहात साजरा होत असून ,
सकाळ पासूनच मंदिरात धार्मिक विधी,त्यानंतर श्री सत्यनारायण महापूजा,आरती व महाप्रसाद, सायंकाळी भजने तसेच रात्रौ ९:०० वाजता
दत्त माऊली दशावतार नाट्य मंडळ, यांच्या दशावतारी नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी या कार्यक्रम सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन,रेडी गावतळेवाडी ग्रामस्थांनी केले आहे.
