डीसीए परीक्षेत ओझर विद्यामंदिरचे यश..

⚡मालवण ता.२७-:
डॉट कॉम असोसिएशन या संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय डीसीए परीक्षेमध्ये मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण सहाय्यक समिती संचालित, ओझर विद्यामंदिर कांदळगाव या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी सुयश मिळविले आहे.

यामध्ये इयत्ता सहावी साठी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये शाळेतील स्मृती उदय परब हिने २०० पैकी १५६ गुण मिळवून जिल्ह्यात पाचव्या स्थानी येण्याचा मान व गोल्ड मेडल पटकावले. त्याचप्रमाणे इयत्ता सहावी मध्ये २०० पैकी १२८ गुण मिळवून योगेश यशवंत आयकर व आस्था सुरेंद्र बागवे यांनी जिल्ह्यात संयुक्त अठरावा क्रमांक मिळवून सिल्वर मेडल प्राप्त केले. इयत्ता सातवी साठी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये शाळेतील चिन्मयी राजेंद्र पारकर व कृष्णा राजन मेस्त्री यांनी ब्रांझ पदक मिळविले.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण सहाय्यक समिती मुंबईचे सर्व पदाधिकारी, शालेय समिती, ओझर विद्यामंदिरचे मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, माता- पालक संघ, शाळा व्यवस्थापन समिती, माजी विद्यार्थी संघ, सर्व पालक व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page