दोडामार्ग पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर घेतली उद्धव ठाकरेंची भेट…

⚡दोडामार्ग ता.२५-: मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महत्त्वपूर्ण संघटनात्मक बैठकीत दोडामार्ग तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी प्रभावी उपस्थिती दर्शवली.
या बैठकीदरम्यान दोडामार्ग तालुकाप्रमुख संजय गवस, मणेरी विभागप्रमुख भिवा गवस आणि संघटक विजय जाधव यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत पक्षसंघटना अधिक बळकट करण्यावर सखोल चर्चा करण्यात आली.
दोडामार्ग तालुक्यातील संघटनात्मक घडामोडी, कार्यकर्त्यांचा वाढता उत्साह तसेच आगामी राजकीय रणनीती यावर पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगत, संघटन विस्तारासाठी अधिक जोमाने काम करण्याचे आवाहन केले.
या भेटीनंतर दोडामार्ग तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पक्षाची विचारसरणी अधिक दृढ करण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाल्याचेही स्पष्ट झाले आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, संघटनात्मक पातळीवर मोठे बदल आणि मजबुती येण्याचे संकेत मिळत आहेत. दोडामार्गच्या भूमीतून शिवसेनेचा झेंडा अधिक उंच फडकवण्याचा निर्धार सर्व पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.

You cannot copy content of this page