सिधुदुर्गनगरी _ .गावराई येथील साई मंदिर चा सतरावा वर्धापन दिन सोहळा २८ ते ३०एप्रिल या दरम्यान आयोजित केला आहे यानिमित्त २१ पासून साई चरित्र पारायण वाचन आणि २८ ते ३० या कालावधीत विविध सांस्कृतिक कार्यक्रम दशावतार सादर होणार आहेत तरी साई भक्तांनी या वर्धापन दिन सोहळा निमित्त आयोजित कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थापकीय सल्लागार शेखर वालावलकर यांनी केले आहे
कुडाळ तालुक्यातील गावराई – सुकळवाड येथे साई मंदिराचा सतरावा वर्धापन दिन संपन्न होत आहे २१ ते २७ एप्रिल या कालावधीत साई सचरित्रपोथी वाचन पारायण आयोजित केले आहे यानिमित्त दररोज भजनांचा बहारदार कार्यक्रम होत आहे २८ रोजी सकाळी ७ वाजता साई चरित्र पारायण वाचन समाप्ती ८ वाजता अभिषेक दुपारी १२: ३०वाजता आरती त्यानंतर दुपारी ३.३० ते ७ साई मंदिर महापुरुष हनुमान मंदिर वरचा नाका ब्राह्मणदेव मंदिर ते साई मंदिर पर्यंत गुरुवर्य दादा आणि गुरुमाऊली यांच्या उपस्थितीत ओम सद्गुरु स्वामी समर्थ जगदमाता परिवारआणि ढोल पथक श्री स्वामी समर्थ मठ घावनाळे कासमळा यांच्या उपस्थितीत भव्य पालखी मिरवणूक आयोजित केले आहे त्यानंतर ७ वाजता दीपोत्सव महाआरती ८ते ११ समई नृत्य समर्थ समय नृत्य खुडी जुवीवाडीतालुका देवगड
बुधवार दिनांक २९एप्रिल रोजी सकाळी ९ ते १२ रूद्राभिषेक होम हवन,दुपारी १२: ३० आरती दुपारी तीन ते सहा नामस्मरण सायंकाळी सात वाजता दीपोत्सव महाआरती रात्रौ ८ वाजता वावळेश्वर दशावतार नाट्य मंडळ तेंडोली यांचा महान पौराणिक ट्रिक्स सिन अयोध्याधीश श्रीराम,हा नाट्यप्रयोग होणार आहे
गुरुवार दिनांक ३० एप्रिल रोजी सकाळी ९ते ११:३० रक्तदान शिबिर,सकाळी १० वाजता सत्यनारायण महापूजा दुपारी १२:३० आरती दुपारी १ते ३ महाप्रसाद दुपारी २ ते ४ हळदीकुंकू,दुपारी २:३० ते ६ संत नामदेव महाराज भक्त मंडळ सिंधुदुर्ग यांचा हरिपाठ नामस्मरण सायंकाळी ७ वाजता दीपोत्सव महाआरती,सायंकाळी ७ .३० ते रात्रौ ८ .३०भव्य साई दिंडी,त्यानंतर रात्रौ ८.३०वाजता जय हनुमान पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ दांडेली आरोस यांचा हा महान पौराणिक नाट्य प्रयोग सादर होणार आहेतरी या कार्यक्रमाचा सर्व साईभक्त भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे .
गांवराई साईमंदीराचा १७ वा वर्धापन दिन सोहळा २८पासून…
