दुसऱ्यांवर टीका करण्यापेक्षा स्वकर्तृत्वावर लक्ष द्यावा: श्वेता कोरगावकर यांचा पलटवार.
⚡बांदा ता.२१-: जिल्ह्यात काॅग्रेस गुलाम म्हणत आहेत की महिला आरक्षण बिलवर भाजप का व्यक्त होत आहे, त्यांना महिला जिल्हाध्यक्षा म्हणून मी सांगू इच्छिते की भारतीय जनता पार्टी ने महिलां आरक्षण विधेयक संदर्भात ठोस भूमिका घेतली आणि भविष्यातही घेणार आहे. याआधी मी स्वतः महिला दक्षता कमीटीवर १९ वर्ष काय काम केले ते जिल्हात माहीती आहे, पत्रकार परिषदेत ही माझ्या कार्याच्या प्रसिद्धी साठी मी कधी दिली नाही . स्वतः काहीही न करता वृत्तपत्रात झळकणारी महिला दुसऱ्यांना प्रश्न विचारणे हास्यास्पद आहे.
नारीशक्ती वंदन संशोधन विधेयक काय आहे हे समजून घेण्यासाठी साक्षी वंजारी यांनी काय प्रयत्न केले ज्यावर त्या चर्चा करणार असो, तरीपण त्यांच्या अज्ञानीपणा साठी पत्रकार यांच्या माध्यमातून मी त्यांना माहीती देत आहे.
आधीच्या 2023 च्या विधेयका नुसार 2026 च्या जनगणनेच्या नंतर व मतदार पुनर्रचना झाल्या नंतर ते विधेयक लागू होणार होते पण हे 33 %महिलांना आरक्षण मिळू नये म्हणून जनगणना व मतदारसंघ पुनर्रचनेला तीव्र विरोध करून तो चालूच ठेवायचा व महिलांना हे आरक्षण मिळू द्यायचे नाही हे काँग्रेस इंडी आघाडीने ठरवले अशी इंडी ची मानसिकता असल्याचे लक्षात येताच ते विधेयक 2029 नंतर त्वरित लागू करण्यासाठी नारिशक्ती वंदन विधेयक लोकसभेत मांडण्यात आलेले आहे.
या मध्ये संविधानातील तरतुदी नुसार संसदेतील जागा लोकसंख्येच्या प्रमाणत संविधानिक नियमानुसार पुनर्रचना होणार आहेत महिला आरक्षण लागू झाले तर आपली घराणे शाही चालणार नाही सामान्य महिलांना संसदेत लोकशाहीत सहभागी होण्याची संधी आरक्षण मिळाल्यास काँग्रेस इंडी आघाडीच्या घराणेशाहीला धोका निर्माण झाल्याचे त्यांना कळले आहे..
त्यात उत्तर दक्षिण असा भेद करणे म्हणजे भारतीय एकात्मतेला बाधा आणण्याचे काम काँग्रेस इंडी आघाडी करते आहे.
आता त्यांच्या पक्षाचा खोटारडेपणाचा मेकअप पुसला जाणार आहे यासाठी वृत्तपत्रात स्टंटबाजी करण्यात येत आहे ती बंद करून तोच वेळ साक्षी वंजारी यांनी अभ्यास करण्यासाठी द्यावा. आपण एक वकील आहात, कुठल्याही बिल वर चर्चा संसदेत होते रस्तावर आमने सामने नाही , इतका अभ्यास तुमचा नाही. संसदेत जो काही प्रकार घडला तो देशातील महिलांनी पाहीला आहे आणि अनेक महिलांनी त्यावर मत व्यक्त केले आहे. आपण दुसऱ्यांवर बोट करण्यापेक्षा स्वकर्तृत्वाचे आॅडीट करून घ्यावे आणि आपल्या पक्षाला असलेला मतरूपी भोपळा फोडून दाखवावा.
