ड्रग्स मुक्त सिंधुदुर्ग’ या विषयावर समीर वानखेडे यांची २३ ला प्रकट मुलाखत…

बॅ. नाथ पै शिक्षण संस्था, साईनाथ जळवी फिल्म व तरुण भारत संवाद यांचे आयोजन..

कुडाळ : येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये बॅ. नाथ पै शिक्षण संस्था, सिंधुदुर्ग, साईनाथ जळवी फिल्म,आणि तरुण भारत संवाद यांच्या संयुक्त विद्यमाने
‘एकच ध्येय ड्रग्स मुक्त सिंधुदुर्ग’ या विषयावर गुरुवार दि. २३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता वरिष्ठ IRS अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त चेन्नई समिर वानखेडे यांची मुलाखत होणार आहे. बॅ. नाथ पै शिक्षण संस्था कुडाळ मध्ये या विशेष मुलाखतिचे आयोजन करण्यात आले आहे असून पत्रकार शेखर सामंत हे समीर वानखेडे यांच्याशी संवाद साधणार आहेत.
आजची तरुण पिढी विविध प्रलोभनाच्या आहारी जाऊन ड्रगच्या विळख्यात सापडून बरबाद होत आहे. स्वतःचे जीवन, कुटुंब, घर, संसार, समाज व्यवस्था यामुळे हतबल झालेली आहे. सामाजिक नीतिमूल्य उध्वस्त होण्याच्या स्थितीमध्ये आहे. यासाठी नागरिकांमध्ये सामाजिक जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने हा ‘एकच ध्येय ड्रग्ज मुक्त सिंधुदुर्ग’ कार्यक्रम सकाळी १० ते १२ या वेळेत बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर व आयोजकांतर्फे करण्यात आलेले आहे.

You cannot copy content of this page