सरपंच संदीप सावंत यांच्या पुढाकारातून ग्रामस्थांना पाणीटंचाईतून दिलासा.
⚡कणकवली ता.१०-: माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वागदे गोपुरी वसाहत येथे पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात आला. वागदे ग्रामपंचायत व सरपंच संदीप सावंत यांच्या पुढाकारातून या भागात विंधन विहीर (बोअरवेल) खोदाई करून ग्रामस्थांना दिलासा देण्यात आला.
गेल्या दहा वर्षांपासून या वसाहतीतील नागरिकांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. एप्रिल-मे महिन्यात विहिरी कोरड्या पडत असल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत होती. ही समस्या लक्षात घेऊन सरपंच संदीप सावंत यांनी स्वतः पुढाकार घेत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तसेच स्वतःच्या खर्चातून बोअरवेल खोदाई केली.
नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत केलेल्या या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत असून, सरपंच सावंत यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या प्रसंगी बाळू मोरे, प्रकाश आरोलकर, कांबळे, गुरु टेंडरकर, रमाकांत आरोलकर, शशी आरोलकर, डीकवलकर, श्रीधर घाडीगावकर आदी उपस्थित होते.
