⚡सावंतवाडी ता.०७-:
भाजपा स्थापना दिन आणि जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने भाजपा युवानेते विशालजी परब यांच्या संकल्पनेतून सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालय तसेच आयुर्वेदीक रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करण्यात आले.
या उपक्रमाद्वारे रुग्णांना आरोग्यदायी आहाराचे महत्त्व पटवून देत त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवाळे तसेच आयुर्वेदीक रुग्णालयाचे डॉ. राजेशकुमार गुप्ता उपस्थित होते.
तसेच केतन आजगांवकर, धिरेंद्र म्हापसेकर, गोविंद साटेलकर, बंटी जामदार, सॕबेस्तीन फर्नांडीस, राजू धारपवार, स्वप्नील घाटे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
