वन्यप्राण्यांच्या धास्तीने तेरवण ग्रामस्थांना दिलासा…

वन विभागाकडून बॅटरी वाटप, लवकरच सोलर दिवे बसविणार..

⚡दोडामार्ग ता.०६-: सह्याद्री पट्ट्यातील तेरवण गावात हत्ती, वाघ, गवेरेडे व अस्वल यांसारख्या वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरक्षिततेसाठी सोलर लॅम्पची मागणी करण्यात आली होती.

या पार्श्वभूमीवर वन विभागाने तात्पुरत्या स्वरूपात ग्रामस्थांना बॅटरी वाटप केले. यावेळी वनक्षेत्रपाल संभाजी पाटील यांच्या उपस्थितीत विजय खेमाजी गवस व ग्रामस्थ सहभागी झाले. लवकरच गावात सोलर लॅम्प बसवून कायमस्वरूपी उजेडाची सुविधा देण्यात येईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.
सहकार्याबद्दल ग्रामस्थांनी उपवनसंरक्षक मिलींद शर्मा व वनक्षेत्रपाल संभाजी पाटील यांचे आभार मानले.

You cannot copy content of this page