दुचाकीस्वार गंभीर जखमी: सकाळी पावणे अकराची घटना, कारच देखील नुकसान..
⚡बांदा ता०६-: मुंबई-गोवा महामार्गावर सटमटवाडी तपासणी नाक्यानजीक भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीवर बसलेल्या युवकाला जोरदार धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. हा अपघात आज सकाळी सुमारे १०.१५ वाजण्याच्या सुमारास घडला.
आदेश शेखर पेडणेकर (वय २८, रा. बांदा) असे जखमी युवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पेडणेकर हे रस्त्याच्या कडेला दुचाकीवर बसलेले असताना अचानक आलेल्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत ते गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर स्थानिकांच्या मदतीने त्यांना तात्काळ बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीची गंभीरता लक्षात घेऊन पुढील उपचारासाठी गोव्यातील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पुढील तपास सुरू आहे.
