पोषण आहार साठी पारंपारिक चुलीचा आधार..
⚡सावंतवाडी ता.०४-: सध्या सगळीकडे गॅस टंचाईचे सावट दिसत असून, गॅस सिलेंडर साठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे.
या गॅस टंचाईमुळे रोजचा जीवनक्रम बदलल्याचे दिसत असताना गावागावात पूर्वी प्रमाणे चुलीवर जेवण करावे लागत आहे.
गॅस सिलेंडर वेळेत मिळत नसल्यामुळे याचा साहजिकच फटका शाळा ,अंगणवाड्यांना बसत आहे.
शाळेतील,अंगणवाड्यातील मुलांचा रोजचा पोषण आहार शिजविण्यासाठी आता कसरत करावी लागत आहे.वेळेवर मुलांना पोषण आहार मिळावा यासाठी सध्या शाळा,अंगणवाड्यामधून चुलीवर आहार शिकविण्याची वेळ आली आहे.
वेळेत विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळावा यासाठीच चुलीवर आहार शिजविला जात आहे.
त्यामुळे प्रशासनाने शाळा अंगणवाड्यांना गॅस सिलेंडर उपलब्ध करुन त्यांची होणारी गैरसोय टाळावी हीच अपेक्षा .
