श्री साईबाबांच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन…

⚡सावंतवाडी, ता. ४-:
श्री साईबाबांच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त श्री साईभक्त मंडळातर्फे गुरुवार, दि. ९ एप्रिल २०२६ रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ७ वाजता साईंची पूजा, अभिषेक व आरतीने होणार आहे. त्यानंतर दुपारी १ ते ३ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ६ वाजता ओंकार महापुरुष भजन मंडळ, माजगाव यांच्या सुरेल भजनांचा कार्यक्रम होणार असून रात्री ८ वाजता कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ, नेरूर (ता. कुडाळ) यांचा ‘कर्मप्रकोप’ हा नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे.
हा सर्व कार्यक्रम सालाईवडा कशाळीकर मेडिकल जवळ, सावंतवाडी येथे पार पडणार आहे. तरी सर्व साईभक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री साईभक्त मंडळ, भवानी चौक, सावंतवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page