⚡दोडामार्ग ता.०३-: क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९९ व्या जयंती निमित्त, ‘समाज जागृती मंच, दोडामार्ग’ यांच्या वतीने दोडामार्ग तालुक्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा विशेष गौरव केला जाणार आहे. पत्रकारीता क्षेत्रातुन दैनिक तरुण भारत संवादचे दोडामार्ग प्रतिनिधी तेजस तुकाराम देसाई यांचा सन्मान होईल.
नुकतीच याबाबत कार्यकारणीची विशेष बैठक संपन्न झाली आणि विविध क्षेत्रातील सन्मानपात्र नावे जाहीर करण्यात आली. यावेळी अध्यक्ष दिपक बुधाजी जाधव, सचिव संतोष सगुण कदम, खजिनदार महेश मोहन जाधव, उपाध्यक्ष गोविंद केशव कदम, सहसचिव शंकर शांताराम जाधव, सदस्य भगवान महादेव जाधव, मंगेश प्रकाश जाधव, उषाकिरण क्रांतीराज सम्राट, जेनिफर मार्शल लोबो, कैतान अंतोन डिसोजा, विजय गुणाजी कांबळे आदी उपस्थित होते. दिनांक ११.०४.२०२६ रोजी सकाळी ९:०० वाजता दोडामार्ग न्यू इंग्लिश स्कूल, दोडामार्ग येथे हा सन्मान सोहळा पार पडणार आहे. तेजस देसाई हे गेली १२ हुन अधिक वर्षे पत्रकारीता क्षेत्रात आहेत. सामाजिक भान असणारी लेखणी म्हणून त्यांची ओळख आहे. ग्रामीण भागाची नाळ जपत विविध विषयावर लिखाण करत सामाजिक पत्रकारीतेमुळे त्यांनी अनेक कुटुंबाना आधार दिला आहे.
पत्रकार तेजस देसाई यांसह विविध क्षेत्रातील व्यक्तींचा होणार विशेष सन्मान…!
