⚡सावंतवाडी ता.०३-:
हनुमान जयंतीच्या पावन निमित्ताने भाजपा युवानेते विशालजी परब यांनी शहरातील विविध हनुमान मंदिरांना भेट देत मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी प्रभू श्री हनुमानाच्या चरणी प्रार्थना करून सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी आशीर्वाद मागितले.
या प्रसंगी केतन आजगांवकर, धिरेंद्र म्हापसेकर, शैलू पै, सुमित वाडकर आदी कार्यकर्ते त्यांच्या समवेत उपस्थित होते. हनुमान जयंतीच्या निमित्ताने शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
