भाजप युवा नेते विशाल परब यांनी मंदिरात उपस्थित राहून दर्शन घेतले..
⚡सावंतवाडी, ता.०३-: येथील न्यू सबनीसवाडा परिसरातील एकमुखी दत्तमंदिराच्या कलशारोहण कार्यक्रमाचा सोहळा भक्तीमय वातावरणात उत्साहात पार पडला. या धार्मिक कार्यक्रमाला भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती.यावेळी भाजपा युवानेते विशालजी परब व सौ. वेदिका परब यांनी मंदिरात उपस्थित राहून मनोभावे दर्शन घेतले व पूजाविधीत सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाला दयानंद गवस, नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे, विनायक पराडकर, अशोक कवठणकर, उल्हास पाटणकर, केतन आजगांवकर, जितू पंडीत, धिरेंद्र म्हापसेकर आदी मान्यवर उपस्थित होते.संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडला असून परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
